kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur : पुणे-मुंबईच्या पर्यटकांना ज्योतिबा मंदिराची भुरळ...

स्वच्छ, थंडगार वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जोतिबा डोंगरावर भाविक पर्यटकांची गर्दी होते.

सकाळ डिजिटल टीम

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) हे ठिकाण समुद्री सपाटीपासून उंचीवर आहे. साहजिकच येथे पावसाळ्यात चक्क नभच जमिनीवर अवतरते. नेहमीच शुद्ध हवा, जोरदार वारे, बोचणारी थंडी, दाट धुके हे वातावरण मनाला भावते. काश्मीर सारखे हे वातावरण जोतिबा डोंगरावर पावसाळ्यात पहावयास मिळते. उन्हाळ्यातही शुद्ध हवा, भुरभूरणारे वारे यामुळे येथे उष्णतेचे प्रमाण खुपच कमी असते. याच वातावरणाची भुरळ आता बेळगावसह पुणे, मुंबई, सातारा व सांगलीतील भाविक, पर्यटकांना पडली आहे. स्वच्छ, थंडगार वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जोतिबा डोंगरावर भाविक पर्यटकांची गर्दी होते.

घंटेचा नाद आठ किलोमीटरपर्यत...

श्री जोतिबा मंदिर परिसरात एक टन वजनाची पंचधातूची महाघंटा असून तिचा आवाज आठ किलोमीटर अंतरावर ऐकू जातो. या घंटेची उंची पावणेचार फूट उंच आहे. पलूस (जि . सांगली) येथील भाविक सर्जेराव नलवडे यांनी स्वखर्चाने ती देवस्थानला अर्पण केली आहे. येथे येणारे भाविक, पर्यटक ही महाघंटा पाहून अवाक् होतात.

देवाच्या दर्शनाबरोबरच वर्षा पर्यटनही

जोतिबा डोंगरावरील चव्हाण तळ्याच्या परिसरातून पुढे कोल्हापूरच्या दिशेने गेल्यावर काही काळ भाविक पर्यटक थांबलेले सर्रास आढळतात. या ठिकाणाहून पन्हाळा गडाचे अगदी थेट समोरून दर्शन होते. आपल्या कुटुंबासमवेत ‘सेल्फी’ घेण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही, त्यामुळे तेथे नेहमीच गर्दी असते. यमाई मंदिरापुढे गेल्यावर नागमोडी वळणाचा हिरवाईचा शालू पांघरलेला घाट नजरेस पडतो. पुढे वारणानगरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. जोतिबा डोगंरावरील हे आगळे वेगळे निसर्गरम्य वातावरण पाहून पर्यटक, भाविक प्रफुल्लित होतात. जोतिबा देवाच्या दर्शनाबरोबरच त्यांचे वर्षा पर्यटनही घडते.

धुक्याचे लोट, कोल्हापूरचे दर्शन

रविवारी तर भाविक दिवसभर या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेतात. जोतिबा डोंगरावर पावसाळ्यात पावसाची रिप रिप तसेच दाट धुके असते. पर्यटक व भाविकांना हे वातावरण अनोळखी असते. पर्यटक परिवारासह चिंब भिजून येथील दाट धुके पावसाचा आनंद लुटतात. जोतिबा डोंगरावर दक्षिण दरवाजा (विजय दरवाजा) येथे अनेक पर्यटक शुद्ध हवेचा स्वाद घेण्यासाठी काही काळ थांबतात. या ठिकाणाहून घाटातील धुक्याचे लोट हवेसोबत डोंगरावर येताना दिसतात. संपूर्ण कोल्हापूर व पन्हाळा गडाचे दर्शन येथूनच होते. पंचगंगा नदीच्या महापूराचे दृश्य याच एकमेव ठिकानाहून होते. रात्रीच्या वेळी विद्युत रोषनाईतील उजळून निघालेले कोल्हापूर शहरही पहावयास मिळते.

या दिवशी असते गर्दी

जोतिबा चैत्र यात्रा, श्रावण षष्ठी यात्रा, दर रविवार, पौर्णिमा, नवरात्र उत्सव दसरा, दिवाळी सुटी, नगरप्रदक्षिणा, खेटे, रविवार काळभैरव जयंती, सरता रविवार या दिवशी डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी असते .

जोतिबा डोंगर येथे उन्हाळ्यात उष्णतेच्या झळा अल्प प्रमाणात असतात. पावसाळ्यात येथे डोंगर धुक्यात लपटलेला भास होतो. काश्मीरसारखे हुबेहूब वातावरण पहावयास मिळते. दरवर्षी आम्ही परिवारासोबत येथील वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतो. बोचऱ्या थंडीत येथे मिळणाऱ्या बासुंदी चहाची चवच न्यारी असते. येथील पुरणपोळी व कटाची आमटी तर खूप चविष्ट व जिभेवर रेंगाळणारी असते.

- अर्चना बागल,

पर्यटक, भाविक, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT