Hasan Mushrif vs Samarjit Ghatge esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : 'राजेंनी ईडी लावली म्हणून मला भूमिका बदलावी लागली, नाहीतर..'; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

‘दुसऱ्यांना त्रास देऊन आमदार होता येत नाही. त्यासाठी हिंमत असावी लागते. माझे विरोधक हिंमत कोठून आणणार?'

गडहिंग्लज : ‘कागलचे राजे आठवड्याला ३० ते ३५ कामांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीसांना भेटायला जायचे. यामध्ये अधिकाधिक सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कामे असायची. ही गोष्ट खुद्द फडणवीस यांनीच कोल्हापूर दौऱ्यावर असताना वारणानगरमध्ये मला खासगीत सांगितल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. या बदल्यांतून राजेंनी एजंटगिरी आणि कमिशन खाण्याचा धंदा केला’, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांचे नाव न घेता केली.

मंजूर १६ कोटींच्या निधीतून गडहिंग्लज (Gadhinglaj) शहरातील विविध विकासकामांचा प्रारंभ व ११० कोटींच्या कामांचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. तसेच मुश्रीफ फाउंडेशनतर्फे पालिकेसाठी सुसज्ज कार्डियाक रुग्णवाहिकाही प्रदान करण्यात आली. #ElectionWithSakal

मुश्रीफ म्हणाले, ‘विरोधकांचे विचार व प्रवृत्ती लोकांसमोर ठेवण्याची गरज आहे. रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेसाठी काम करून त्यांच्या सुख-दु:खात समरस झालो. जनतेशी कौटुंबिक नाते तयार करणे ही माझी प्रवृत्ती. दुसऱ्या बाजूला, आमदार होण्यासाठी मला व माझ्या कुटुंबीयांना ईडीखाली अडकवून त्रास देण्याची विरोधकांची प्रवृत्ती आहे. सरंजामांना इस्टेट वाचवायला व लोकांना फसवायलाच सत्ता लागते असे दिवंगत सदाशिवराव मंडलिक नेहमी म्हणायचे. त्याचा प्रत्यय आता मला येतोय. दलितांची जमीन हडपणारे, कामगारांच्या चुलीत पाणी ओतणारे, दुसऱ्यांना तुरुंगात घालणारे एकीकडे, तर जात, धर्म, पंथ, वेळ-काळ न पाहता रात्रंदिवस काम करणारा मी दुसऱ्या बाजूला. जनतेनेच आता दोन्ही प्रवृत्ती तपासून डोळे उघडून व अभ्यास करून मतदान करावे.’

यावेळी किरण कदम, रामगोंडा पाटील, रमेश रिंगणे, रेश्मा कांबळे, नरेंद्र भद्रापूर यांची भाषणे झाली. ‘गोडसाखर’चे नूतन अध्यक्ष प्रकाश पताडे व राष्ट्रवादीचे नूतन कार्याध्यक्ष नरेंद्र भद्रापूर यांचा सत्कार झाला. लाडक्या बहिणी व बांधकाम कामगारांनी मुश्रीफ यांचा सत्कार केला. महेश सलवादे यांनी स्वागत केले. दीपक कुराडे यांनी आभार मानले.

आमदार व्हायला हिंमत हवी

मुश्रीफ म्हणाले, ‘दुसऱ्यांना त्रास देऊन आमदार होता येत नाही. त्यासाठी हिंमत असावी लागते. माझे विरोधक हिंमत कोठून आणणार? राजे आहेत म्हणून फडणवीसांनी त्यांना मान दिला. त्यांनी मागेल ते दिले. परंतु त्यांची गुरूदक्षिणा न देता हे राजे शरद पवार राष्ट्रवादीत गेले. राजेंनी ईडी लावली म्हणून मला भूमिका बदलावी लागली. त्यांनी त्रासच दिलाच नसता तर भूमिका बदलण्याची गरजच नव्हती. शरद पवार हे माझे आजही दैवत आहेत. त्यांची संमती घेऊनच बाहेर पडल्याने त्यांना गुरुदक्षिणा देण्याचा आम्ही प्रयत्न तरी केला. परंतु हे राजे त्यांचे गुरू फडणवीसांना न सांगताच बाहेर पडले. यामुळे राजेंनी आम्हाला निष्ठा शिकवू नये.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाकेंचा "गोंडस लेकरू" म्हणून उल्लेख

Ranji Trophy 2024: जम्मूचा शुभम महाराष्ट्रावर पडतोय भारी; एकट्याने डाव उभारला अन् ठोकले दणदणीत द्विशतक

Uddhav Thackeray Dasra Melava: दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील 'हे' रस्ते असणार बंद!

Dussehra Melava 2024 Live Updates: "नाहीतर तुम्हाला उलथे केल्याशिवाय राहणार नाही," जरांगेंचा सराकरला इशारा

सांगलीच्या जागेसाठी 'या' दोन नेत्यांत रस्सीखेच; विश्वजित कदम, विशाल पाटलांकडे कार्यकर्त्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT