'विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची मांदियाळी असणार आहे. कारण पाच वर्षे कोणाला शांत बसता येणार नाही.'
कोल्हापूर : शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी पुणे येथे कागलमधील मतदारांचा मेळावा घेतला. मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आल्या होत्या. याबाबत विचारले असता मुश्रीफांनी नाव न घेता घाटगेंवर टीका केली. मात्र, ही टीका करताना त्यांनी पातळी सोडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मुश्रीफांच्या वक्तव्याची चर्चा सुरू होती.
पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुणे येथे झालेल्या मेळाव्याबद्दल त्यांना विचारले. त्यावेळी मुश्रीफ म्हणाले, ‘पुणे येथे झालेल्या कागल तालुक्यातील मतदारांच्या मेळाव्यात खासदार सुळे यांनी माझ्यावर टीका केलेली नाही. त्यांनी ईडीचा विषय काढला. पण, कोणत्या प्रवृत्तीमुळे ईडीचे प्रकरण पुढे आले हे सर्वांना माहिती आहे.
मुंबईत कागलमधील आमच्या समर्थक मतदारांचा मेळावा झाला. याला न भुतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. आम्ही तीन हजार लोकांचे नियोजन केले होते. मात्र, सहा हजार लोक आले होते. त्यांनी त्यांच्या गावात झालेली कामे पाहिलेली आहेत.’
विधानसभा निवडणुकीबद्दल मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची मांदियाळी असणार आहे. कारण पाच वर्षे कोणाला शांत बसता येणार नाही. त्यामुळे अनेक नेते त्यांची मुले वेगवेगळ्या पक्षप्रमुखांना भेटत राहणार आहेत. प्रत्येक पक्ष आपल्याला अधिकाधिक जागा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या उमेदवारालाच तिकीट मिळणार आहे. आरक्षणाच्या मुद्यावरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.’ असेही मुश्रीफ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.