Kagal Tehsil office clerk Ashwini Karande esakal
कोल्हापूर

Kagal Tehsil : कागल तहसीलमधील अव्वल कारकून 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; कारवाईमुळे तहसील कार्यालयात उडाली खळबळ

गौण खनिज खरेदी-विक्री व्यवसाय करण्यासाठी एका व्यावसायिकाने कागल तालुक्यात भाडे कराराने जमीन घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी कारंडे (Ashwini Karande) यांनी संबंधिताकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती.

कागल : गौणखनिज भाडे कराराची जमीन एन. ए. करण्यासाठी ३० हजारांची लाच घेताना कागल तहसील कार्यालयातील (Kagal Tehsil Office) अव्वल कारकून अश्विनी अतुल कारंडे (वय ४६, रा. न्यू शाहूपुरी कोल्हापूर) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Bribery Department) सापळा रचून पकडले. या कारवाईमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजता कागल तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी : गौण खनिज खरेदी-विक्री व्यवसाय करण्यासाठी एका व्यावसायिकाने कागल तालुक्यात भाडे कराराने जमीन घेतली आहे. जमीन एन. ए. करण्यासाठी मूळ मालकाच्या नावाने तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. हे काम करून देण्यासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी कारंडे (Ashwini Karande) यांनी संबंधिताकडे ६० हजार रुपयांची लाच मागितली होती.

त्यापैकी ३० हजार रुपयांची रक्कम घेऊन येण्यास अश्विनी कारंडेने संबंधित व्यावसायिकाला सांगितले. या व्यावसायिकाने कारंडेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा केली. त्याप्रमाणे मंगळवारी तहसील कार्यालयात सापळा रचला. तहसील कार्यालयात सायंकाळी सव्वाचारला अश्विनी कारंडेला ३० हजार रुपये घेताना विभागातील अधिकाऱ्यांनी पकडले.

त्यानंतर तिला कागल पोलिस ठाण्यात आणण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरकार नाळे यांनी ही कारवाई केली. पथकात पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील यांचाही समावेश होता. रात्री उशिरा या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते.

‘तहसील’चे धाबे दणाणले

कारवाईमुळे कागल तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. अश्विनी कारंडेवर कारवाई झाल्याचे समजताच तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्षणात कार्यालय सोडले. काहींनी आवारातील उपहारगृहात थांबून कारवाईची माहिती घेण्याचा प्रयल केला. काहींनी तर घरचा रस्ता धरला.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी तसेच त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागितल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. अशी तक्रार दिल्याने तुमचे कोणतेही शासकीय काम थांबत नाही.

-सरदार नाळे, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT