Katyayani Jewellery shop Robbery Balinga Karveer esakal
कोल्हापूर

Kolhapur : सराफ दुकानात गोळीबार, पिस्तुलाच्या धाकानं पत्नीची बोबडीच वळली; प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरारक अनुभव

एक चोरटा पिस्तुल घेऊन दुकानाच्या बाहेर थांबून लोकांना मराठी भाषेत धाक दाखवत होता.

सकाळ डिजिटल टीम

काय प्रकार सुरू आहे हे बघण्यासाठी मी व पत्नी दुकानाबाहेर आलो तर आमच्यावरही त्या चोरट्याने पिस्तुल रोखून आम्हालाही धमकावले.

बालिंगा : कोल्हापूर-गगनबावडा मुख्य रस्त्यावर बालिंगा येथे कात्यायनी ज्‍वेलर्सच्यासमोरच (Katyayani Jewellers) माझी बेकरी आहे, मी व पत्नी बेकरीत काम करत असतानाचा समोरच्या सराफ दुकानातून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला म्हणून बाहेर आलो.

तर, एक चोरटा पिस्तुल घेऊन दुकानाच्या बाहेर थांबून लोकांना मराठी भाषेत धाक दाखवत, त्याचवेळी एक रिक्षाचालकाने रिक्षा थांबवत हा प्रकार बघण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावरही बाहेर थांबलेल्या चोरट्याने पिस्तुल रोखली. त्यामुळे तोही निघून गेला.

हा सर्व प्रकार बघून माझ्या पत्नीची बोबडीच वळली, काय घडलंय हे कळायच्या आता चोरटे दुकानात गेले आणि सोने लुटून पळूनही गेले, अशी माहिती ही घटना प्रत्यक्ष पाहणारे टी. जी. जांभळे यांनी दिली. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्री. जांभळे यांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी भेट घेतली. त्यावेळी या घटनेचा थरारक अनुभव जांभळे यांनी सांगितला.

गेल्या वीस वर्षांपासून माझी बेकरी याच रस्त्यावर आहे. पत्नी व मी दुकानात नेहमी असतो. आजही नेहमीप्रमाणे आम्ही दोघेच दुकानात होतो. आमच्या बेकरीसमोरच रमेश माळी यांच्या मालकीचे कात्यायनी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाला लागूनच एक मेडिकल व पंक्चरवाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास माळी यांच्या सराफ दुकानातून बंदुकीच्या गोळींचा आवाज आला.

त्या आवाजाचे दिशेने मी बघितले, त्यावेळी एक चोरटा हातात पिस्तुल घेऊन सराफ दुकानाच्या बाहेरच उभा होता. तो बाहेरच्या लोकांना इथे थांबायचे नाही, असे म्हणत त्यांच्यावर पिस्तुल रोखत होता. त्याचवेळी एक रिक्षा दुकानाच्या दारातून जात होती, रिक्षावाल्याला काहीतरी दुकानात गडबड झाल्याचे समजले, म्हणून तो थांबला तर त्या रिक्षाचालकांवरही चोरट्याने पिस्तुल रोखून त्याला हटकले, हा अनुभव सांगताना जांभळे यांनाही कापरे भरले होते.

काय प्रकार सुरू आहे हे बघण्यासाठी मी व पत्नी दुकानाबाहेर आलो तर आमच्यावरही त्या चोरट्याने पिस्तुल रोखून आम्हालाही धमकावले. अचानक घडलेल्या या प्रकाराने आणि चोरट्याने दिलेल्या धमकीमुळे माझ्या पत्नीची बोबडीच वळली. त्यानंतर आम्ही दोघे परत दुकानात आलो. पत्नी वरच्या मजल्यावर गेली आणि मी घडलेला प्रकार फोनवरून सांगितला. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पण, डोळ्यसमोर घडलेल्या या प्रकाराचा मोठा धक्का माझ्यासह माझ्या पत्नीलाही बसल्याचे श्री. जांभळे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT