कोल्हापूर: प्रचंड चुरस आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या संस्था गटाच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) वरचढ ठरले. दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganapatrao Patil)यांचा पराभव करत यड्रावकर त्यांनी दुसऱ्यांदा जिल्हा बँक गाठली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, (Raju Shetti)माजी आमदार उल्हास पाटील (Ulhas Patil)यांच्यासह तालुक्यातील दिग्गजाना धक्का देणारा निकाल ठरला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत यड्रावकरांना रोखण्यासाठी तालुक्यातील बहुतांश नेते मंडळी गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे एकत्र आली.
जिल्हा बँक निवडणुकीत यड्रावकरांना रोखण्यासाठी तालुक्यातील बहुतांश नेते मंडळी गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे एकत्र आली. यड्रावकर विरुद्ध इतर अशी ही निवडणूक झाली. संचालक असलेल्या यड्रावकरांना क्षारपड जमीन सुधारणा तसेच अन्य योजनांचा लाभ मिळवून दिला याचा लाभ निवडणुकीत झाला.
विधानसभा निवडणुकीनंतर शिरोळ तालुक्याच्या राजकारणात यड्रावकर गट सक्रिय झाला. नगरपालिका निवडणुकीत आजवर सा. रे. पाटील पर्यायाने गणपतराव पाटील गट यड्रावकरांबरोबर होता. आता मात्र यड्रावकर-गणपतराव पाटील यांच्या आघाडीच्या घडामोडीकडे लक्ष लागले आहे. यड्रावकर यांनी गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या निवडणुकीची चांगली तयारी केली होती. गणपतराव पाटील यांची उमेदवारी अनपेक्षितपणे पुढे आली.
जिल्हा बँकेच्या निमित्ताने गणपतराव पाटील यांनी यड्रावकर विरोध केल्याने त्यांच्यातील राजकीय वितुष्ट कोणते स्वरूप धारण करते यावर भविष्यातील पालिकेचे राजकारण अवलंबून असेल. असे असले तरी काँग्रेसचे काही नगरसेवक यड्रावकर यांच्याशी मिळतेजुळते घेत असल्याने यड्रावकर यांना प्रखर विरोध होईल असे चित्र आज तरी नाही. नगरपालिकेवर वर्चस्व राखणे मंत्री यड्रावकर यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार असल्याने जिल्हा बँकेतील विजयाचा गुलाल झटकून त्यांना पालिका निवडणूकीची तयारी करावी लागणार आहे.
तालुक्यात दबदबा निर्माण होण्यास मदत
बुधवारी मतदानानंतर जयसिंगपूर शहरात यड्रावकरांच्या विजयाचे फलक झळकले. यावरून निवडणुकीतील विजयाची खात्री त्यांना होती. आगामी काळात तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा निर्माण होण्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल कारणीभूत ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.