कोल्हापूर : निराशेचे ढग हटवून झाले गेले विसरून जाऊ, साऱ्यांच्या आयुष्यात कोजागरीचे चांदणे शिंपू...अशा शुभेच्छा देत रविवारी (ता. ९) कोजागरीचा उत्सव साजरा होणार आहे. कोरोनामुळे या उत्सवावर दोन वर्षे बंधने होती. यंदा मात्र सळसळत्या उत्साहात हा उत्सव होणार असून मसाले दूध, खीर, स्नेहभोजनाबरोबरच कविता, गाणी, गप्पांचेही फड रंगणार आहेत.
दरम्यान, ज्यांचे आयुष्य अंधारात चाचपडते आहे, अशांच्या आयुष्यात चांदणं शिंपण्याचाही हा उत्सव. त्यामुळे सजग तरुणाई आणि विविध सेवाभावी, सामाजिक संस्थांना भेट देणार आहेत. जेवढे सेवाकार्यासाठी देता येणे शक्य आहे, तेवढी मदत ही मंडळी देतील.
महाप्रसादाचे ६९ वे वर्ष
शारदीय नवरात्रोत्सवानंतर अश्विन पौर्णिमेला अंबाबाई मंदिरात महाप्रसादाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तत्कालीन सरकारच्या रेशनिंग निर्बंधामुळे ही परंपरा खंडित झाली. पण, ६८ वर्षांपूर्वी महालक्ष्मी भक्त मंडळाने ही परंपरा पुन्हा सुरू केली. भक्त मंडळ आणि देवस्थान समितीतर्फे हा महाप्रसाद होतो. कोरोनामुळे दोन वर्षे या महाप्रसादावरही निर्बंध होते. मात्र, यंदा पारंपरिक उत्साहात प्रसादाचे वाटप होणार असून वीस हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.
धार्मिक, वैज्ञानिक, आरोग्यदायी महत्त्व
शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागरी पौर्णिमेला धार्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो, त्यामुळे या दिवशी चंद्राचा उजेड हा जास्त प्रमाणात पृथ्वीवर पडत असतो. चंद्राचा हा उजेड शुद्ध आणि सात्विक असतो, असे मानले जाते. महाराष्ट्रातील शेतकरी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या पौर्णिमेच्या दरम्यान, शेतकऱ्यांची पिके काढायला येतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतात. काही ठिकाणी कलशावर महालक्ष्मी देवीची स्थापना करून पूजन केले जाते. सर्वत्र रात्री आपापल्या परिसरातील मंडळी एकत्र येऊन मसाले दूध, तांदळाची खीर पितात. त्यालाही वैज्ञानिक तसेच शास्त्रीय कारणे आहेत. चंद्राचा सात्विक उजेड हा या दूध किंवा खिरीमध्ये पडल्यामुळे अनेक रोग बरे होतात, असे
मानले जाते.
शहरात १९८७ च्या सुमारास कोजागरी कवी मंडळाची स्थापना झाली. सध्याचे अनेक प्रसिद्ध कवी सुरुवातीला याच मंडळात आपल्या कविता सादर करायचे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मंडळातील एखाद्या सदस्याच्या घरात कवींची ही मैफल रंगते. गेली साडेतीन दशके ही परंपरा अगदी नेटाने सुरू आहे. कोरोना लॉकडाउन काळात एकत्र येण्यावर निर्बंध असल्याने ‘यू ट्यूब’च्या माध्यमातून या मैफली रंगल्या. विशेष म्हणजे या मैफलींसाठी म्हणून अनेक नवोदित मंडळी कविता करू लागले आणि त्यांचे पुढे काव्यसंग्रहही प्रकाशित झाले. रविवारी (ता. ९) या मंडळांची काव्यमैफलही रंगणार आहे.
एकीचाही संदेश
शहरातील उद्याने, अपार्टमेंट, सोसायट्यांच्या माध्यमातून हा उत्सव सामुदायिकपणे साजरा होईल. यानिमित्ताने केवळ घरातील सदस्यांनीच नव्हे, तर त्या-त्या परिसरातील सर्वांनी मिळून एकत्र यावे आणि आनंदोत्सव साजरा करावा, हीच त्यामागची उदात्त भावना आहे.
महाप्रसादाचे ६९ वे वर्ष
शारदीय नवरात्रोत्सवानंतर अश्विन पौर्णिमेला अंबाबाई मंदिरात महाप्रसादाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तत्कालीन सरकारच्या रेशनिंग निर्बंधामुळे ही परंपरा खंडित झाली. पण, ६८ वर्षांपूर्वी महालक्ष्मी भक्त मंडळाने ही परंपरा पुन्हा सुरू केली. भक्त मंडळ आणि देवस्थान समितीतर्फे हा महाप्रसाद होतो. कोरोनामुळे दोन वर्षे या महाप्रसादावरही निर्बंध होते. मात्र, यंदा पारंपरिक उत्साहात प्रसादाचे वाटप होणार असून वीस हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.
धार्मिक, वैज्ञानिक, आरोग्यदायी महत्त्व
शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागरी पौर्णिमेला धार्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो, त्यामुळे या दिवशी चंद्राचा उजेड हा जास्त प्रमाणात पृथ्वीवर पडत असतो. चंद्राचा हा उजेड शुद्ध आणि सात्विक असतो, असे मानले जाते. महाराष्ट्रातील शेतकरी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या पौर्णिमेच्या दरम्यान, शेतकऱ्यांची पिके काढायला येतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतात. काही ठिकाणी कलशावर महालक्ष्मी देवीची स्थापना करून पूजन केले जाते. सर्वत्र रात्री आपापल्या परिसरातील मंडळी एकत्र येऊन मसाले दूध, तांदळाची खीर पितात. त्यालाही वैज्ञानिक तसेच शास्त्रीय कारणे आहेत. चंद्राचा सात्विक उजेड हा या दूध किंवा खिरीमध्ये पडल्यामुळे अनेक रोग बरे होतात, असे मानले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.