Kolhapur Accident News Esakal
कोल्हापूर

Kolhapur Accident News: हृदय पिळवटून टाकणारी घटना! भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; 4 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Kolhapur Accident News: सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी झाले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Kolhapur Accident News: कोल्हापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता.हातकणंगले) येथील पुलाजवळ रविवारी (ता. १७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

वाठार (ता. हातकणंगले) येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार, तर सात जण जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार पुलाजवळील सेवा रस्त्यावर सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान अपघात झाला. टेम्पोला जोडलेले सेंट्रिंगचे मिक्सर मशीन रस्त्याकडेला सोडताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली.

मृतांमध्ये तिघे सेंट्रिंग मजूर असून, ते सर्व भादोले (ता. हातकणंगले), तर वाठार येथील एक पादचाऱ्याचा समावेश आहे. जखमींमध्ये वडिलांसह त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. अपघातात सचिन सदाशिव धनवडे (वय ४०), बाबालाल इमाम मुजावर (५०), विकास वड्ड (२६, सर्व रा. भादोले), श्रीकेशव पास्वान (६० रा. वाठार) ठार झाले. सचिन पांडुरंग भाट (३०), कुमार तुकाराम अवघडे (४२), सुनील कांबळे (४०), भास्कर दादू धनवडे (६०, सर्व रा. भादोले), लक्ष्मण मनोहर राठोड (४०), त्यांच्या मुली सविता (१७) आणि ऐश्‍वर्या (१५, तिघे रा. मूळ विजापूर, सध्या भादोले) अशी जखमींची नावे आहेत.

भादोले (ता.हातकणंगले) येथील स्लॅब कंत्राटदार रियाज मुजावर १५ मजुरांसह टेम्पो व क्रॉंक्रिट मिक्सर यंत्रसामग्री घेऊन शिये येथे सकाळी नऊ वाजता गेले होते. शिये येथे एका इमारतीच्या स्लॅबचे काम दिवसभर सुरू होते. ते संपल्यानंतर कामगार आणि इतर साहित्यासह टेम्पो गावाकडे परतत होता. टेम्पोतून सर्व मजूर वाठार येथील पुलाजवळ आले. तेथे सेवा रस्त्यावर टेम्पो वळवून थांबविण्यात आला. तेथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कामावर क्रॉंकिटचे मिक्सर मशीन ठेवून सर्वजण घरी जाणार होते.

यासाठी त्यांनी सेवा रस्त्याकडेला टेम्पो घेतला. त्यातून पाच ते सहा मजूर खाली उतरले. त्यांनी टेम्पोला बांधलेले मिक्सर मशीन सोडवण्याचे काम सुरू केले. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने मिक्सरला जोराची धडक दिली. ट्रकने रस्त्यावरील मजुरांना चिरडले. त्यातील एक जागीच ठार झाला, तर इतर तिघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. धडक इतकी जोरात होती की अनेकांची शरीर अस्ताव्यस्त झाले. टेम्पोमधील अन्य गंभीर जखमी झाले.

धडकेनंतर अपघातग्रस्त टेम्पो जवळच्या शेतात पंधरा ते वीस फुटांवर जाऊन थांबला. टेम्पोतील मजूरही जखमी झाले. अपघाताची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे बघ्यांची गर्दी झाली. गर्दीमुळे जखमींना मदत करण्यास अडथळे येत होते .घटनास्थळी पोलिस व रुग्णवाहिका दाखल झाली.

पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेमध्ये घालून सीपीआर रुग्णालयात हलवले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक भीममोंडा पाटील, उपनिरीक्षक लक्ष्मण सलगर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस दाखल झाले होते. याशिवाय महामार्ग पोलिसही आले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. त्याचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

घटनास्थळी विदारक चित्र

टेम्पोमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यासह सेंट्रिंग कामगार होते. अपघातस्थळाचे विदारक चित्र होते. घटनास्थळी जखमींच्या रक्ताचे थारोळे साचले होते. पायातील चप्पल, डबे, कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते.

भादोलेवर शोककळा

बाबालाल मुजावरही मुख्य कंत्राटदार आहेत. त्यांनी कष्टातून प्रगती केली. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. तिघांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा आहे. नागरिक चौका-चौकांत एकत्र येऊन थांबले होते.

असा झाला अपघात

वाठार पूल सेवा रस्त्यावर टेम्पो येऊन थांबला

त्याला बांधलेले क्राँक्रिट मिक्सर उतरविण्याचे काम सुरू

त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकची धडक

अनेक जण चिरडले; धडकेत टेम्पो फरपटत वीस फुटांवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT