kolhapur ambabai darshan Tourists want these basic facilities sakal
कोल्हापूर

Kolhapur Ambabai Darshan : अंबाबाईच्या दर्शनाला अडचणींची रांग

भाविकांचा हिरमोड; पुरेशा मूलभूत सुविधा मिळणार कधी?

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कडक उन्हाळ्यात आग ओकणारा सूर्य, गाडी पार्किंगसाठी न मिळणारी जागा, पार्किंग मिळाले तरी चालत जाऊन गाठावे लागणारे मंदिर आणि मंदिरात जाण्यापूर्वी पायाला बसणारे चटके अशा अडचणींशी सामना करत पर्यटक, भाविक अंबाबाई मंदिरात पोचतात. दर्शनरांगेत उभे राहतानाच पुरुष आणि महिलांची वेगळी रांग करावी लागते.

यात आई, मुलगी एकीकडे आणि मुलगा, वडील दुसरीकडे अशी विभागणी होते. दर्शन झाल्यानंतर चुकामूक होते. फोन करून एकमेकांना शोधण्याशिवाय पर्याय नसतो. एवढे करूनही दर्शन लांबूनच घ्यावे लागते. ढकलाढकलीत देवीचे मुखही नजरेत भरत नाही. मनोभावे दर्शन घेण्याची इच्छा असताना मनस्तापालाच सामोरे जावे लागते, अशी भावना शनिवारी बाहेरगावच्या पर्यटकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मांडव घातला आहे. मात्र, उन्हाळी सुटीमध्ये पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या दारातही मांडव घातला पाहिजे, अशी मागणी पर्यटकांनी केली.

सध्या पागा बिल्डिंगमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र, ती अपुरी आहेत. भाविकांची संख्या लाखांत आणि स्वच्छतागृहे दोनच, अशी परिस्थिती आहे. आहेत ती स्वच्छतागृहेही अस्वच्छ असतात. वयस्कर महिला असतील तर अर्धा तास प्रतीक्षा कशी करणार, असा सवालच एका आजींनी विचारला.

दर्शनातही दुजाभाव का?

आम्ही दरवर्षी दर्शनासाठी येतो. गतवर्षीपर्यंत पितळी उंबऱ्यापासून आतमध्ये जाऊन दर्शन घेतले. सध्या लांबूनच घ्यावे लागले. दर्शनच मिळणार नसेल तर का यायचे? व्हीआयपी दर्शन तर अनेकांनी घेतले. एवढ्या लांबून येऊन दर्शन नाही आणि काहींना आरामात दर्शन, असा दुजाभाव का?

- भारती महाडिक, पुणे

स्वच्छतागृहांची संख्या वाढवा

पंढरपुरात कितीही भाविक आले तरी त्यांच्यासाठी राहण्याची मोफत सुविधा आहे. कोल्हापुरात तशी सुविधा नाही. भाविकांना राहायचे असेल तर पैसे मोजावे लागतात. असुविधांना सामोरे जावे लागते. स्वच्छतागृहे आहेत मात्र संख्या वाढवली पाहिजे. दोनच स्वच्छतागृहांमध्ये जाण्यासाठी महिलांची मोठी रांग लागते. पाऊण तासानंतर नंबर आला. तेथेही स्वच्छता नव्हती, पाणीही मुबलक प्रमाणात हवे.

- सुनीता पोरे, पंढरपूर

तिन्ही भाषांत दिशादर्शक फलक हवेत

आम्ही अमराठी आहोत. शहरात आल्यापासून आमची भाषा कोणाला कळत नाही आणि त्यांची भाषा आम्हाला कळत नाही. परराज्य, परजिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या माहितीसाठी मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांत माहिती व दिशादर्शक फलक असावेत.

- मुरली व हेमलता, हैद्राबाद

पार्किंग सुविधा सक्षम हवी

अंबाबाई मंदिराच्या परिसराच्या जवळपासच पार्किंगची सुविधा हवी. आम्हाला दसरा चौकात गाडी पार्किंग करून यावे लागले. दसरा चौकातून मंदिरापर्यंत ॲटो रिक्षा केली. आम्ही १२ जण होतो, तीन रिक्षा कराव्या लागल्या. आर्थिक भुर्दंड तर बसलाच आणि गैरसोयही झाली.

- प्रमोद सोनटक्के, सातारा

परिसर स्वच्छ हवा

महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतातील मंदिरे पाहता सर्वत्र स्वच्छता दिसते. तिरुपतीनंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. येथे आल्यानंतर निराशा होते. स्वच्छतागृहे, पाण्याची मुबलक व्यवस्था पाहिजे. महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधाही इतर देवस्थानांप्रमाणे केली पाहिजे. प्राथमिक सुविधाही मंदिर आवारात नाहीत.

- लक्ष्मी पाटील, इचलकरंजी

निवास व्यवस्था हवी

राहण्याची मोफत सुविधा नाही म्हणून आम्ही आज जोतिबाचा नवस फेडून अंबाबाईचे दर्शन घेऊन माघारी जात आहोत. निवास, महाप्रसादाची सुविधा असती, तर नक्कीच राहिलो असतो. कोल्हापूरसह परिसरातील आणखी पर्यटनस्थळे पाहता आली असती.

- सुधीर घाटगे, अकलूज

पर्यटकांना हव्यात या सुविधा

  • मंदिराजवळच पार्किंग किंवा पार्किंगपासूनच शटल सेवा

  • पिण्याच्या पाण्याची सोय

  • स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी

  • व्हीआयपी दर्शन नकोच

  • दर्शन जवळून घेता यावे

  • ज्येष्ठांसाठी वेगळी दर्शन रांग

  • महिलांसाठी हिरकणी कक्ष

  • स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी

  • मंदिराची माहिती, अन्नछत्र यांचे माहिती फलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT