hasan mushrif sakal
कोल्हापूर

सत्ताधारी पॅनेलची 3 दिवसात घोषणा; सेनेला देणार 2 जागा

राष्‍ट्रवादीतर्फे ४२ जणांच्या मुलाखती

सकाळ डिजिटल टीम

कोल्‍हापूर : जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Bank Election) रविवारी (ता.२०) सत्ताधारी पॅनेलची घोषणा केली जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे राष्‍ट्रवादीतर्फे ४२ इच्‍छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सेवा संस्‍था गट सोडून ९ जागा आहेत.

यातील राष्‍ट्रवादीला किती जागा मिळणार, यावर मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘हे सर्वसमावेशक पॅनेल आहे. गतवेळी निवेदिता माने (Nivedita Mane) राष्‍ट्रवादीकडून लढल्या होत्या. खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) शिवसेनेतून आले होते. यावेळी हे दोन्‍ही उमेदवार शिवसेनेकडून जिल्‍हा बँकेची निवडणूक लढत आहेत, तर शिरोळच्या सेवा संस्‍था गटातून लढण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्याठिकाणी तज्ज्ञ संचालकाचा प्रस्‍ताव आहे.

मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘राष्‍ट्रवादीकडून जिल्‍हा बँकेसाठी इच्‍छुक असलेल्या उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. पॅनेल करताना अनेक अडचणी आहेत. सर्वांना उमेदवारी देणे शक्य नसल्याचे संबंधितांना सांगितले आहे. रविवारी पॅनेलची घोषणा झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांनी सोमवारी अर्ज मागे घ्यावेत, अशा सूचना आज दिल्या आहेत.’ यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बँकेचे आजी, माजी संचालक उपस्‍थित होते.

आवाडेंची जबाबदारी कोरे, पी. एन. यांच्यावर (Prakas Awade, Vinay Kore,P.N.Patil)

आमदार प्रकाश आवाडे यांनी सत्ताधारी गटाकडून उमेदवारी असल्याचे जाहीर केले आहे, यावर मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ‘आमदार आवाडे यांच्यासोबत चर्चा करण्याची जबाबदारी आमदार विनय कोरे व आमदार पी. एन. पाटील यांच्यावर सोपवली आहे. आवाडे यांनी नागरी बँक, पतसंस्‍था, पगारदार पतसंस्‍था गटातून ही निवडणूक लढावी, अशी चर्चा झाली होती. त्यानंतरच त्यांनी ही घोषणा केली असावी. याबाबत शुक्रवारी(ता.१७) सत्ताधारी गटाच्या नेत्यांची बैठक होणार असून, त्यात चर्चा होईल.’

यांच्या झाल्या मुलाखती

कृषी, पणन व शेतीमाल प्रक्रिया-तानाजी गडकरी, बाबासाहेब पाटील, उषा पाटील. नागरी बँक, पतसंस्‍था, पगारदार पतसंस्‍था गट-तानाजी गडकरी, राजाराम पाटोळे, अशोक पोवार, आर.के.पोवार. इतर शेती संस्‍था व व्यक्‍ती सभासद -अभिषेक डोंगळे, धैर्यशील पाटील, भैया माने.* महिला गट-माधुरी जांभळे, रूपादेवी पाटील, शैलजा सतीश पाटील, सुमित्रा उमेश भोईटे, सुरमंजिरी लाटकर. *अनुसुचित जाती जमाती गट -सविता कांबळे, सुनील कांबळे. * विमुक्‍त जाती, जमाती, विशेष मागास प्रवर्ग- रामाप्‍पा कारागिर, आर. के. पोवार, दत्ताजीराव हजारे. *इतर मागासवर्ग गट- असिफ फरास.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT