कोल्हापूर: जुन्या शहराच्या सभोवती तलावांची (Lake)एक सलग मालिका बघायला मिळते. रंकाळा,(Rankal)कुंभार तलाव, महार तलाव, खाराळा, लोणार, शिंगोशी (Shingoshi), कोटितीर्थ, उत्तरेश्वर, पद्माळा व रावणेश्वर ही तळी परिसरातील शेतीसाठी वापरली जात होती. तटबंदी, देवळे, रस्ते, नि इमारतीसाठी दगड काढण्याच्या निमित्ताने काही दगडाच्या खाणींसाठी तलावांचे परिसर उकरले गेले असतील; मात्र रावणेश्वर, पद्माळा, कोटीतीर्थ, महार तलाव हे सिंचन करण्याच्या हेतूने बांधले होते. त्यांना मातीचा बांध घातला आहे. उताराने पाटाद्वारा पाणी देण्याची पद्धत वापरात होती. १८५४ मध्ये ग्रॅहॅमने (Graham)लिहिलेल्या सांख्यिकी अहवालात पद्माळा येथील पाण्यावर ५८ बिघा, रावणेश्वर येथील पाण्यावर साडेआठ बिघा जमीन भिजत होती. त्यातून अनुक्रमे ५४२ रुपये व ७० रुपये कर मिळत होता. हे जलाशय धार्मिक दृष्टीनेही परिचित होते.
kolhapur city Lake historical information by uday gaikwad
रावणेश्वर तलाव आज अस्तित्वात नाही. तो बुजवून शाहू स्टेडियम तयार केले आहे. रामेश्वर व लक्ष्णनेश्वर लिंग आहे. यादव राजा बल्लाळराय व सिंघनदेव राजाचा शिलालेख असून, त्यामध्ये रामेश्वर मंदिर आणि रावणेश्वर तलावाचा उल्लेख आढळतो. म्हणजेच या दोन राजवटीत हे तलाव अस्तित्वात होते हे स्पष्ट होते. या नजीकच्या वसाहतीला हिरापूर असे नाव होते. मुक्तंबिका देवीचे मंदिर, साठमारी, विवेकानंद आश्रम याच परिसरात आहे.
कलातपस्वी आबालाल रहेमान यांनी जलरंगात रंगवलेले या परिसराचे चित्र हाच आता तलावाची तत्कालीन स्थिती दाखवणारा पुरावा आहे. पद्माळ्याला नृसिंहतीर्थ असेही नाव आहे. त्याच्या काठावर पद्मावती देवीचे मंदिर आहे. गजेंद्रलक्ष्मी, नाग, गणेश, मारुती, प्रल्हादेश्वर मूर्ती आहेत. याच परिसरात अकरा मारुतींचेही एक मंदिर आहे. या नजीकच्या वसाहतीला नवे जिजापूर असे नाव होते. त्याच्या बाजूला पागा आणि राधाकृष्ण मंदिर आहे. तिथे मुरलीधर, राधाकृष्ण व विठ्ठल मूर्ती आहेत. १८५७ च्या बंडात हे मंदिर बंडखोरांचे आश्रयस्थान होते. त्याच ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. नंतरच्या काळात तलावाच्या दक्षिण काठावर इंग्रजी सैन्याच्या छावण्या होत्या.
अलीकडे तलावाचा वापर बंद करून तेथील दलदलीत कैद्यांकडून शेती केली जात होती. आज तलावाच्या विस्तीर्ण क्षेत्रात क्रीडा संकुल बांधले आहे. क्रीडा संकुलात पाणी कसे येते, असा बाळबोध प्रश्न प्रशासनाला पडला आहे. शहरादरम्यान इतके तलाव आणि जलसमृद्धी असताना ते बुजवलेे. तलावांचे गाव म्हणून असलेली ओळख पुसली. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या गावाला वणवण करावी लागते, हीच गोष्ट नियोजनातील कमतरतेची आणि दृष्टिकोनाच्या अभावाची आहे. ही चूक झाली आहेच. आता ती सुधारता येण्यापलीकडे गेली आहे;पण आज असलेल्या तलावाबाबत तरी ही चूक न करता जलसमृद्धी टिकवावीच लागेल.
राजर्षी शाहूंचा आदेश
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिनांक १६ मार्च १९०६ रोजी काढलेल्या आदेशात रंकाळा, पद्माळा, खंबाळा, वरुणतीर्थ, महार तलाव, जयंती धरण या ठिकाणी गाळ साठला असून, तो शेतकऱ्यांनी काढून नेण्यास परवानगी दिली होती. यावरून तलाव संवर्धन करण्याचा प्रयत्न दिसतो.
kolhapur city Lake historical information by uday gaikwad
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.