kolhapur collector daulat desai reach fastly at CPR fire within a minute on bicycle in kolhapur 
कोल्हापूर

Kolhapur CPR Fire : जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता सायकलवरुनच गाठलं सीपीआर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पहाटे सव्वाचारच्या सुमारास सीपीआरमध्ये आग लागल्याची माहिती देणारा दूरध्वनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आला. आगीची माहिती मिळताच तोंडाला मास्क, अंगात टी शर्ट, हॉफ पॅंट, पायातील चप्पलवर (स्लिपर) सायकलवरूनच जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या १० मिनिटांत सीपीआर गाठले. 

सीपीआरमध्ये पहाटे चारच्या सुमारास आग लागली. व्हेंटिलेटरवर असणारे काही रुग्ण हलविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. यातच सव्वाचारला जिल्हाधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी आपल्या वाहनचालकाला फोन करा, त्याला बोलावून घ्या, यात वेळ न घालवता आहे त्या स्थितीच सायकलवरून दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास करत सीपीआरमधील घटनास्थळी आले.  

शॉर्टसर्किटने व्हेंटिलेटर मशीनला आग लागल्याचे कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सीपीआरमध्ये आल्यानंतर तत्काळ रुग्णांची माहिती घेतली. ज्या रुग्णांना ऑक्‍सिजन लावला होता, त्यांना ऑक्‍सिजनपुरवठा होता काय? याचीही पाहणी केली. डॉक्‍टरांकडून त्यांच्या प्रकृतीचीही विचारणा केली. सुमारे तासभर ते तिथेच थांबून राहिले.

सर्व परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर ते पुन्हा सायकलवरूनच घरी गेले. जिल्हाधिकारी सायकलवरून आल्याचे पाहून तिथेल वॉर्डबॉयसह इतर कर्मचाऱ्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. तसेच, जिल्हाधिकारी असूनही कोणत्याही प्रोटोकॉल सांभाळण्यात वेळ न घालवता सायकलवरून आल्याचे कौतुकही तिथे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी केले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT