kolhapur cpr hospital sakalmedia
कोल्हापूर

CPR Hospital : उपचार सेवेला बदल्यांचा फटका; रुग्णांची ससेहोलपट

वैद्यकीय शिक्षणचा ढिम्म कारभार

शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

सीपीआरच्या डॉक्टरांनी कोरोना काळात प्रभावी उपचार सेवा दिली, यात वादच नाही. कोरोना नियंत्रणात येताच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचार सेवा सुरू झाली, तेव्हा सुविधा देण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्‍ठांकडून दुर्लक्ष झाले. तांत्रिक अडचणी आल्या. परिणामी गंभीर रुग्णांना ॲडमिट करून घेण्यापासून ते शस्त्रक्रिया करण्यापर्यंत अनेक उणिवा आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना येथे मनस्ताप सोसावा लागत आहे. त्या उणिवा सांगणारी मालिका आजपासून...

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठांनी मुंबईतून दिलेल्या आदेशानुसार अधिष्‍ठातांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या, सिंधुदुर्गात बदलीवर पाठवलेले २५ वैद्यकीय प्राध्यापक, साधन सामग्रीचा अपुरेपणा, आदी कारणांचा सीपीआरच्या वैद्यकीय उपचार सेवेला फटका बसत आहे. सीपीआर रुग्णालयात नियमित व गंभीर रुग्णांच्या १५० हून अधिक शस्त्रक्रियाच थांबल्या आहेत. तरीही वैद्यकीय शिक्षण विभाग गंभीर नसल्याने पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीच आता लक्ष घालण्याची गरज आहे.

कोरोनाची तीव्रता कमी होताच वैद्यकीय शिक्षण विभागाने सहा भूलतज्ज्ञ, सहा विभाग प्रमुख, अशा अनुभवी डॉक्टरांची सिंधुदुर्गला बदली केली. तेथे नव्याने होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मेडिकल कौन्सिल पाहणी करणार आहे. तेथे अनुभवी प्राध्यापक नव्या महाविद्यालयात असल्याचे दाखविण्यासाठी या बदल्या आहेत. वास्तविक राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोल्हापूरच्या तुलनेत जास्त डॉक्टर आहेत. तेथील प्रत्येकी दोन-चार प्राध्यापक डॉक्टर पाठवण्याऐवजी कोल्हापूर व मिरजेतील महत्त्वाच्या डॉक्टरांच्या बदल्या सिंधुदुर्गला केल्या. त्यांना परत कोल्हापुरात आणणार की नाही हेही स्पष्ट नसल्याबद्दल डॉक्टरांत नाराजी आहे. परिणामी सीपीआरच्या उपचार सेवेचा भार मोजक्या सात तज्ज्ञ डॉक्टर व निवासी (प्रशिक्षणार्थी) डॉक्टरांच्या खांद्यावर आहे.

तीन महिन्यांत सरासरी प्रलंबित शस्त्रक्रिया

  • हृदय शस्त्रक्रिया अंदाजे- ४७

  • गंभीर पोट विकार- ४२

  • स्त्री रोग- २८

  • अस्थिरोग- ३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT