Increased risk of dengue in kolhapur district  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यात डेंगीची धास्ती

डेंगीसदृश आजाराने शेकडो त्रस्त, आरोग्‍य यंत्रणा सक्रिय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात डेंगीसदृश आजाराची लाट आहे. घराघरांत ताप तसेच ‘प्लेटलेस’ कमी झालेले रुग्ण संख्या वाढत आहे. असे डेंगीसदृश शेकडो रुग्ण खासगी व शासकीय दवाखान्यात उपचार घेत आहेत. महिन्याभरात शहरात २२ तर जिल्ह्यात २३ व्यक्तींना डेंगी झाल्याचे निदान झाले आहे.

पावसाळी वातावरणात अनेकांची प्रकृती बिघडली. अनेकांना ताप, सांधेदुखी झाली. सोबत प्लेटलेस कमी होणे, प्रमाण वाढले,अशी लक्षणे अंगावर काढून उशिरा दवाखान्यात येणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. यात गंभीर रुग्णांना ॲडमीट केले जाते. शासकीय रुग्णालयात रोज १० ते २० रुग्ण उपचाराला येतात. यातील तीन-चार रुग्ण डेंगीचे आहेत तर उर्वरित डेंगीसदृश आजारांचे आहेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याची गरज आहे. अशी अपेक्षा वैद्यकीय यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.

जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाचे अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी सांगितले, डेंगी व चिकनगुण्‍याची लक्षणे सारखी आहेत. हे दोन्ही आजार डासांपासून होतात. पावसाळ्यात डासांची पैदास वाढते. यातील इजिप्त इडीस हा डास चावला तर त्यांच्यापासून डेंगीचा प्रादुर्भाव होतो. ज्या भागात डास अंडी घालतात, त्यांची पैदास वाढते. त्या भागात डेंगीचे रुग्ण वाढू शकतात. जिल्ह्यात ग्रामीण व शहरात विशेषतः ज्या भागात दलदल आहे

किंवा पाण्याचा जुना साठा असतो. तिथे असे डास तयार होतात. त्यामुळे ग्रामपंचायत व महापालिकेला परिसर स्वच्छता करण्याचे लेखी पत्रे दिले आहे. घराघरांत सर्वेक्षणही सुरू आहे.

अशी घ्या खबरदारी

हिवताप नियंत्रण विभागाचे अधिकारी डॉ. खटावकर म्हणाले, ‘‘जुनी भांडी, कुंड्या, टायर, नारळ करंवट्या, फ्रीजच्या प्लेटमधील पाणी, एसीचे पाणी, कंटेनर यातील पाण्यात डास कोष तयार होतात. त्यातून डेंगीचा डास जन्माला येतो. असे पाणी साठणार नाही, ते ही सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवू नये, याची काळजी घ्यावी. त्यासाठी घरातील व अवतीभोवतीचे पाणी आठवड्यातून बदलावे. घराघरांत एक दिवस कोरडा पाळावा, दलदलीवर औषध फवारणी किंवा जळके ऑईल टाकावे.

शहरातील डेंगीचे हॉटस्पॉट

आर.के.नगर पाचगाव मोरेवाडी राजेंद्रनगर सदरबझार

कदमवाडी लक्षतीर्थ वसाहत शिवाजी पेठ

या भागात डेंगीचे दहापेक्षा अधिक रुग्ण सापडले तर अन्य भागात १० रुग्ण आहेत

शहरात एकूण २२ डेंगीचे रुग्ण सापडले

असा आहे डेंगीचा फरक

एनएस-१ ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर तो डेंगी म्हणता येत नाही, मात्र खासगी रुग्णालयात ही टेस्ट डेंगी पॉझिटिव्ह धरली जाते. मात्र व्हायरल इन्फेक्शनमध्ये ही चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. म्हणून डेंगीचे लक्षणे असणाऱ्यांची ‘आयजीएम'', ‘आयजीजी’ या दोन चाचण्या पॉझिटिव्ह आल्या तरच डेंगी असल्याचे गृहीत धरले जाते, शासकीय रुग्णालयातही या दोन्ही चाचण्या होतात, असेही डॉ. खटावकर यांनी सांगितले.

डेंगी सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तर डेंगी झालेले रोज एक-दोन रुग्ण सापडतात. कोणतेही लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे वेळीच उपचार केल्यास डेंगी १०० टक्के बरा होतो. रुग्णांनी लक्षणे अंगावर काढू नयेत.

- डॉ. उमेश कदम, अधीक्षक, सेवा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT