कोल्हापूर

चिंताजनक! प्रत्येक तासाला कोरोनाचे दोन बळी; १७ दिवसांत ८४७ मृत्यू

निवास चौगले - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना( Covid 19 Died)मृत्यूचा दर देशात सर्वाधिक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District)गेल्या १७ दिवसांत तासाला दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इतर जिल्हा व परराज्यातील रुग्णांच्या मृत्यूची संख्या वजा केल्यास जिल्ह्याचा मृत्युदर आजही २.८४ टक्के आहे, तर ती संख्या गृहीत धरल्यास हाच दर तब्बल ३.९४ वर जातो.

जिल्ह्यात १ ते १७ मेअखेर कोरोनाचे तब्बल २१ हजार ४५४ बाधित आढळले, ८४७ मृत्यू झाले. मृत्यू झालेल्या रुग्णांत इतर जिल्हा व राज्याबाहेरील ९७ रुग्णांचा समावेश आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात १७ दिवसांत ७५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर शहरातही मृत्यूचे प्रमाण सुमारे २.७२ टक्के आहे. शहरात १७ दिवसांत पाच हजार १४० रुग्ण सापडले. यापैकी १४० जणांचा मृत्यू झाला. शहर व जिल्ह्याबाहेरील मृत रुग्णांची संख्या वजा जाता जिल्ह्यात ६१० जणांचा बळी घेतला आहे.

जिल्ह्यात पाच मे नंतर कोरोनामुळे मृत्युसंख्येत वाढ झाली. यात सर्वाधिक ६२ मृत्यू हे १५ मे रोजी झाले आहेत, तर १२ मे रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी २२७४ पॉझिटिव्ह आढळले. वर्षभरातील हा सर्वात मोठा आकडा आहे. गेल्यावर्षी पाच सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक १७८६ एवढे पॉझिटिव्ह आढळले होते.

तारीख - रुग्ण-मृत्यू-शहरातीलरुग्ण-शहरातील मृत्यू-परजिल्ह्यातीलमृत्यू-जिल्ह्यातील मृत्यू

१ ११२३ ३७ २४२ ८ ४ २५

२ ८१६ ३४ १७७ ३ ४ २७

३ ९३० ३५ २२९ ८ २ २५

४ ९८४ ४४ २१९ ९ ६ २९

५ १५५३ ५३ ३६० १३ ५ ३५

६ १६१३ ५४ ४०१ ४ ७ ४३

७ १०८६ ६० ३०८ ७ १० ४३

८ ९९६ ४६ १९४ १३ ७ २६

९ ९२१ ५० २११ १० ७ ३३

१० ९९८ ६१ २५२ ११ ९ ४१

११ १४९४ ५१ ३७५ ९ ५ ३७

१२ २२७४ ५८ ४२८ १४ ५ ३९

१३ १३०९ ५३ ४२७ ३ ४ ४६

१४ १०५४ ४७ २६६ ८ ६ ३३

१५ १७६१ ६२ ३७५ ११ ५ ४६

१६ ११६७ ५२ २९५ १४ ६ ३२

१७ १३७५ ५० ३८१ ५ ५ ४०

एकूण २१,४५४ ८४७ ५१४० १४० ९७ ६००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT