शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
कोल्हापूर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठी गळती लागलीय. एकीकडं पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) झटताना दिसत आहे.
तर, दुसरीकडं शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालीय. हा भूकंप शिवसेना (Shiv Sena) नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार असल्याची चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (A. Y. Patil) हे सध्या पक्षावर नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याचं सांगितलं जात आहे.
कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याचं कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ढाल-तलवार हातात घेण्याच्या मानसिकतेत आहेत. ए. वाय. पाटलांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता सोळांकूर इथं प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा होत असून याच मेळाव्यात पाटील आपली खदखद व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे. ए. वाय. पाटील यांच्यावर सध्या राष्ट्रवादीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र, पक्षानं ही जबाबदारी दिली असली तरी सातत्यानं राजकीय खच्चीकरण केल्याची भावना त्यांची आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.