सध्या राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी आणि वारणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूर : धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Kolhapur Flood) पंचगंगेच्या (Panchganga River) पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेने बुधवारी मध्यरात्रीनंतर धोका पातळी ओलांडली. त्यामुळे महापुराचा विळखा पडल्याचे स्पष्ट झाले. राधानगरी धरण ९५ टक्के भरले असून, आज संध्याकाळपर्यंत धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, आलमट्टीतून २.२५ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सध्या राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी आणि वारणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढली असून, पंचगंगेची पाणी पातळी 44.4 फुटांवर आहे. नदीकाठची गावे आणि शहरातील काही भागांमध्ये पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील ४०२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
यामध्ये महापालिका क्षेत्रातील १०२ नागरिकांचा समावेश आहे. आज वाऱ्याचा वेगही प्रचंड असल्याने शहरातील १४ झाडे पडली. जिल्ह्यातील १० राज्यमार्ग, २७ जिल्हा मार्गावर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातील ८१ बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील पावसाने ५० टक्के सरासरी या पंधरा दिवसांतच पूर्ण केली आहे. राधानगरी, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होणे सुरूच आहे. पंचगंगा नदीचे पाणी एका दिवसात अर्धा फूट वाढली. पाणीपातळी मंद गतीने वाढत असली, तरी महापुराचा विळखा पडला आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
तुळशी ३.४७ २.७६ ७९.८
वारणा ३४.३९ २९.२८ ८५.१३
दूधगंगा २५.३९ १७.६७ ६९.६०
कासारी २.७७ २.०४ ७३.३६
कडवी २.५१ २.५२ १००
कुंभी २.७१ १.९३ ७०.९७
पाटगाव ३.७१ ३.३२ ८९.२२
चिकोत्रा १.५२०.९७ ६३.७८
चित्री १.८८ १.८९ १००.००
जंगमहट्टी १.२२ १.२२ १००
घटप्रभा १.५६ १.५६ १००
जांबरे ०.८१ ०.८२ १००
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव, बीड, आरे व बाचणी, यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे, चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, भोसलेवाडी, कोपार्डे, शिगाव, सवतेवाडी व सरुडपाटणे, येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी व दत्तवाड, निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगाव व चिखली, साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे व जरळी कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगाव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण ८१ बंधारे पाण्याखाली आहेत.
राधानगरी तालुक्यातील सर्व धरणांवर अतिवृष्टी कायम
राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी बंद
प्रयागचिखलीस बेटांचे स्वरूप
‘आरोग्य सेवक’ परीक्षार्थी चिखलीत पुरात अडकले
शिनोळी खुर्द येथे अंगणवाडी इमारतीवर झाड कोसळले
चित्री, उचंगी प्रकल्प तर फये लघुप्रकल्प तुडुंब
शाहूवाडी उत्तर भागाला बेटाचे स्वरूप
नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली
मुरगूड - निढोरी दरम्यान पुराचे पाणी
कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गवर केर्ली गावाजवळ पाणी आल्याने या मार्गावरची वाहतूक थांबली होती. आज सायंकाळी पाणी पातळी वाढल्याने शिवाजी पुलावरून होणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली. पुलाच्या शहराकडील बाजूला बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवण्यात आली. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्लीजवळ मंगळवारी सकाळी पाणी आले. एरवी नदीची पाणी पातळी ४३ फूट झाली की पाणी या मार्गावर येत होते; मात्र यंदा ४२ फूट पाणी पातळी झाल्यावर मार्गावर पाणी आले. त्यामुळे दुपारपर्यंत या मार्गाने वाहतूक संथ सुरू होती. संध्याकाळी पाणी अधिक वाढल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली. त्यामुळे रात्री नऊ वाजता पोलिसांनी शिवाजी पुलाच्या शहराच्या बाजूला बॅरिकेड् लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली. त्यामुळे चिखली, आंबेवाडी, वडणगे, निगवे, केर्ली गावांना जाण्याचा मार्ग बंद झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.