Kolhapur Flood esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood : पंचगंगेच्या पातळीत घट; राधानगरी धरणाच्या तीन स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू, वारणाच्या विसर्गातही वाढ

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील (Kolhapur-Ratnagiri National Highway) वाहतूकही अद्याप सुरू झालेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

आलमट्टी व कोयना धरणातील विसर्ग कायम आहे, तर वारणा व पाटगाव धरणातील विसर्ग वाढविला आहे.

कोल्हापूर : तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल रात्रीपासून पुन्हा धरणक्षेत्रासह जिल्ह्यात धुवाधार हजेरी लावली. त्यात थोडा दिलासा म्हणजे पहाटे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद होऊन तीन दरवाजांमधून ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. त्यामुळे पंचगंगा नदीच्या (Panchganga River) पातळीत दिवसभरात एक इंचाने वाढ झाली. परंतु दुपारनंतर त्यामध्ये पुन्हा एक इंचाने घट झाली.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप पाणी उतरलेले नाही. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील (Kolhapur-Ratnagiri National Highway) वाहतूकही अद्याप सुरू झालेली नाही. आलमट्टी व कोयना धरणातील विसर्ग कायम असून, वारणा धरणातील विसर्ग वाढविला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर गेल्या तीन दिवसांपासून ओसरला होता. परंतु, आज रात्री धरणक्षेत्रासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे राधानगरीच्या चार दरवाजातून ७२१२ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. यातील एक दरवाजा पहाटे बंद झाला.

त्यामुळे उर्वरित तीन दरवाजातून ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. त्यामुळे धोक्याच्याखाली गेलेल्या पंचगंगेची पाणी पातळीत दिवसभरात एक इंचाने वाढ झाली. त्यानंतरही यामध्ये काही इंचाने वाढ होऊ शकते. सद्यस्थितीत पंचगंगा धोक्याच्या खाली ४२ फूट ४ इंचांवर वाहात आहे. आलमट्टी व कोयना धरणातील विसर्ग कायम आहे, तर वारणा व पाटगाव धरणातील विसर्ग वाढविला आहे. जिल्ह्यात अद्याप अनेक ठिकाणी पावसाचे पाणी पसरले आहे. त्यामुळे एकूण ९३ मार्ग आणि ७३ बंधारे पाण्याखाली आहेत. पावसामुळे जिल्ह्यात घरे, जनावरांचे गोठे यांची पडझड होऊन ५७ लाख ३९ हजारांचे नुकसान झाले. त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.

दृष्टिक्षेपात जिल्हा...

  • पंचगंगा धोक्याच्या पातळी खाली

  • घरे, जनावरांचे गोठे पडझडीचे ५७ लाखांचे नुकसान

  • ९६ मार्ग बंद, ७३ बंधारे पाण्याखाली

  • आलमट्टी, कोयनेतील विसर्ग ‘जैसे थे’

  • वारणा, पाटगावचा विसर्ग वाढविला

  • नुकसानीचे पंचनामे सुरूच

धरणसाठा (टीएमसीमध्ये, ता. १ ऑगस्ट)

धरण क्षमता पाणीसाठा टक्केवारी विसर्ग (क्युसेकमध्ये)

  • राधानगरी ८.३६ ८.२७ ९८.८६ ५७८४

  • वारणा ३४.३९ २९.६० ८६.०५ ११५८५

  • आलमट्टी १२३.८ ६६.६९ ५४ ३५००००

  • कोयना १०५.३ ८५ ८१.३२ ४२०००

  • दुधगंगा २५.३९३ २२.१८ ८७.३६ ९१००

  • तुळशी ३.४७ ३.२९ ९४.७७ १५००

  • कासारी २.७७४ २.३१ ८३.३५ २७०

  • कडवी २.५१६ २.५२ १०० ६७०

  • कुंभी २.७१५ २.३७ ८७.२९ ३००

  • पाटगाव ३.७१६ ३.७२ १०० २१४७

  • चिकोत्रा १.५२२ १.४५ ९५.०४ १००

  • चित्री १.८८६ १.८९ १०० ५३१

  • जंगमहट्टी १.२२३ १.२२ १०० ३३५

  • घटप्रभा १.५६० १.५६ १०० ५५९६

  • जांबरे ०.८२० ०.८२ १०० ८३३

  • आंबेओहोळ १.२४० १.२४ १०० ११०

  • सर्फनाला ०.६७० ०.४८ ७१.०६ ६६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : मराठी माणसांचे दोन पक्ष तोडण्याचे काम भाजपाने केले - जयंत पाटील

SCROLL FOR NEXT