narsinhwadi datta mandir esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood Update : नृसिंहवाडीत पहिला दक्षिणद्वार सोहळा, ‘दिगंबरा...दिगंबरा...’चा जयघोष करीत स्नान पर्वणीचा लाभ

Kolhapur Flood Update: ‘दिगंबरा... दिगंबरा...’चा जयघोष करीत स्नान पर्वणीचा लाभ

सकाळ डिजिटल टीम

नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा आज दुपारी एक वाजता झाला. अधिक महिना व रविवारच्या सुटीमुळे भाविकांनी स्नान पर्वणी साधण्यासाठी मंदिर परिसरात एकच गर्दी केली होती.

विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. त्यामुळे आज दुपारी एक वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. दक्षिणद्वार होण्याआधी अनेक भाविक पाण्यात राहूनच श्रींचे चरण कमलावरून उत्तर दिशेतून दक्षिणेकडे पाणी जाण्याची म्हणजेच दक्षिणद्वार सोहळा होण्याची प्रतीक्षा करत होते. अर्धा तासाने भाविकांची प्रतीक्षा संपली व एक वाजता सोहळा झाला.

यावेळी ‘दिगंबरा दिगंबरा.. च्या’ जयघोषात अत्यंत भक्तिभावाने भरपावसात नदीच्या पात्रात राहून स्नानपर्वणीचा आनंद अनेकांनी घेतला. या वेळी दत्त मंदिराची पाण्यातून प्रदक्षिणा घालण्यासाठी व तीर्थ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्रींचे चरण कमलाच्या दक्षिण बाजूने तीर्थ घेण्यासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली.

दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती सोशल मीडियामुळे व्हायरल झाल्याने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज, कर्नाटक आदी ठिकाणांहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे व सर्व विश्वस्त यांच्या पुढाकाराने जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे.

स्नान पर्वणीचा आनंद

रविवार व अधिक महिना यामुळे आज दक्षिणद्वार सोहळ्यासाठी मोठी गर्दी झाली होती. भर पावसात ‘दिगंबरा... दिगंबरा’च्या गजरात भाविकांनी स्नान पर्वणीचा आनंद घेतला. विशेषतः महिलांनी पाण्यामध्ये बांधण्यात आलेल्या सुरक्षा दोराचा आधार घेत दत्त मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परप्रांतीयांच्या मतांचा गठ्ठा कुणाच्या पारड्यात? मतदारांना गोंजारण्यासाठी घेतल्या बैठका, कोण ठरणार वरचढ?

Accident : भरधाव इको कारची ट्रकला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Latest Marathi News Updates : वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्याआधी भारतीय संघातील सराव सामना का महत्त्वाचा? कोचनेच केला खुलासा

आधी मनसे आता भाजप? महायुतीला मत द्या म्हटल्याने सायली संजीव ट्रोल; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

SCROLL FOR NEXT