कोल्हापूर : उच्चशिक्षित आणि कॉलेजकुमार आता दम मारो दमऽऽऽच्या झुरक्यात अडकत आहेत. पोलिसांनी तरुणाईला हटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चक्क तो गांजा ओढत असल्याचे निर्दशनास आले.
त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो एम.बी.ए. असल्याचा व महसूलमधील एका निवृत्त अधिकाऱ्यांचा मुलगा असल्याची माहिती पुढे आली. छाप्यानंतर गांजा ओढणाऱ्यांमध्ये कॉलेज विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. त्यामुळे आता गांजा विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आज हातात मुबलक पैसा पडत असल्याने तरुणाई चंगळवादाकडे झुकली आहे. त्यातच ती व्यसनात गुरफटत निघाली आहे, असे सहज बोलले जाते; मात्र याची वस्तुस्थिती पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून दिसली. उच्चशिक्षित, कॉलेज तरुणाई आता ‘दम मारो दमऽऽऽ’च्या...विळख्यात सापडली आहे.
होळी-रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एक ते सहा मार्चदरम्यान शहरात ठिकठिकाणी ओपन बार आणि गांजा ओढणाऱ्यांवर राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा या चारही ठिकाणी पोलिसांनी कारवाई झाली. कारवाईत सापडलेल्या व्यक्तींमध्ये उच्चशिक्षित आणि कॉलेजकुमार असल्याचे निदर्शनास आले. एवढंच नव्हे, तर संबंधित व्यक्ती गांजा ओढूनच कामावर जात असल्याचीही माहिती पुढे आली.
आपला मुलगा कॉलेजला जातो म्हणजे नेमके काय काय करतो, याकडे पालकांनी डोळसपणे पाहण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. आई-वडिलांना संसाराचा गाडा चालवण्यासाठी रोज धावपळ करावी लागते.
त्यातून मुलांना पॉकीट मनी दिला की, आपली बहुतांशी जबाबदारी संपली अशीच काहींची स्थिती आहे. पॉकीट मनी दिला म्हणजे आपण आपली पालकत्वाची जबाबदारी पूर्ण करीत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात यामुळेच कॉलेजकुमार गांजासारख्या व्यसनाकडे वळत असल्याचे दिसून येते.(पूवार्ध)
कोणत्याही कारणावरून व्यसन करणे चुकीचे आहे. पालकांचा मुलांशी कमी झालेला संवाद, मुलांकडून अधिक अपेक्षा, त्यांच्या मर्यादा, गुण, अवगुण याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. या संवादाच्या अभावामुळेच मुलांकडून चुकीची कृत्ये घडून मुले दिशाहीन बनली आहेत. व्यसनाची सवय लागण्यापूर्वीच पालकांनी त्यांना आवर घातला पाहिजे. गांजामुळे मेंदूसह शरीरातील अन्य अवयांवर दूरगामी परिणाम होतो.
- डॉ. अजय केणी
सांगली जिल्ह्यातून गांजा आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. कोल्हापुरात गांजा कोण आणते, त्याची विक्री कशी होते, यावर पोलिसांची नजर आहे. लवकरच विक्रेत्यांचाही पर्दाफाश होईल, असा विश्वास आहे.
- मंगेश चव्हाण पोलिस उपअधीक्षक, कोल्हापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.