Kolhapur News sakal
कोल्हापूर

Kolhapur News: शासकीय कर्मचारी संपाचा परिणाम ; आज घंटानाद

दाखला मिळेना, कर भरता येईना

सकाळ वृत्तसेवा

State govt Employees Strike : शासकीय, निमशासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे सीपीआरमधील रुग्णांना रुग्णालयातून इतरत्र हलवावे लागले. तहसीलदार कार्यालयातील दाखले मिळत नाहीत.

तसेच मार्चअखेर असतानाही लोकांना कर भरण्यास अडचण येवू लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जुन्या पेन्शनसाठी उद्या (ता. १७) टाऊन हॉल येथे घंटानाद करुन शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.

जुनी पेन्शन मिळावी, यासाठी शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षककेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सीपीआर रुग्णालयात विविध उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना वेळेत आणि अपेक्षित उपचार मिळत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना इतरत्र हलवले जात आहेत.

यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयातून जातीचे, उत्पन्नासह इतर दाखले रखडले आहे.

हजारो दाखले प्रलंबित असल्याने लोकांकडून जाहीररित्या संताप व्यक्त केला जात आहे. मार्चअखेर आपले सर्व व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी अनेकांना कर भरायचा आहे.

या सर्व करदात्यांची कुचंबणा होत आहे. शासनाच्या विविध योजना पूर्ण करण्यासाठी किंवा निधीचे वाटप करण्याचे काम पूर्ण पणे ठप्प झाले आहे.

यावर तत्काळ तोडगा काढला पाहिजे. लोकांना होणारा नाहक त्रास थांबला पाहिजे, यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे.

तर दुसरीकडे शिस्तभंगाची कारवाई करा नाहीतर मेस्मा लावा, आम्ही मागे हटणार नाही, अशा जोरदार घोषणा देत आज शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी टाऊन हॉल येथे आंदोलन केले.

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, यासाठी दोन दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. याला बहुतांशी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत काम बंद ठेवले. आजही टाऊन हॉल येथे सकाळी ११ ते दुपारी चारपर्यंत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. तीन दिवसांपासून शासकीय यंत्रणा कोलमडून पडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT