Jyotiba Yatra Updates sakal
कोल्हापूर

कोल्हापूर: जोतिबाची यात्रा; भाविकांनी डोंगर फुलला

उद्या जोतिबाची मुख्य यात्रा; सुरक्षा यंत्रणा कडक

राजेश नागरे

जोतिबा डोंगर: श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, शासकीय यंत्रणेने डोंगरावरच तळ ठोकला आहे. देवस्थान समिती, ग्रुप ग्रामपंचायत, पोलिस, पुजारी ग्रामस्थांसह शासकीय यंत्रणा परिश्रम घेत आहेत. सलग सुट्यांमुळे यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी डोंगर पिंजून काढून जय्यत तयारी केली. आज डोंगरावर पोलिसांना बंदोबस्ताचे वाटप केले. दुपारी गावात संचलन केले. श्वानपथकाद्वारे मंदिर व परिसराची तपासणीही केली.

मुख्य यात्रा शनिवारी असल्याने बार्शी लातूर उस्मानाबाद बीड भागातील भाविक सासनकाठीसह कोल्हापुरात येत आहेत. पंचगंगा नदीत स्नान करून डोंगराकडे पायी प्रवास सुरू होतो. हलगी पिपाणी सनई ढोलाच्या गजरामुळे डोंगराकडे येणार रस्ते दुमदूमून जात आहेत. सासनकाठीचा गोंडा शिखराला लावून मुख्य मंदिराभोवती वाद्यांच्या तालावर प्रदक्षिणा काढल्या जात आहेत. गुलाल खोबऱ्याची उधळणीमुळे डोंगर यात्रेपूर्वीच गुलालमय झाला आहे. उद्या (ता. १५) सायंकाळी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होतील.

पाडळी, विहे, किवळ, कसबे डिग्रज, मिरज तसेच इतर मानाच्या सासनकाठ्या दाखल होतील. यंदाही खोबरेवाटी फेकण्यास बंदी असून व्यापारी दुकानदार यांनी खोबरेवाटीचे तुकडे करून विकणे बंधनकारक आहे. यंदा प्रथमच केमिकलयुक्त गुलाल विक्रीवर बंदी आणली असून स्वच्छ व सुगंधी गुलाल विक्रीसाठी ठेवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. या गुलालाची तपासणी सध्या सुरू आहे. बिगर मानाच्या सासनकाठ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गायमुख तलावात १ कोटी लिटर पाणीसाठा केला आहे. पाण्याचे शुद्धीकरण केले आहे.मेहता ट्रस्टचे अन्नछत्र आजपासून कोल्हापुरातील आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उद्यापासून तीन दिवस मोफत अन्नछत्राचे आयोजन केले असून कोणतीही व्यक्ती व संस्थेच्या देणगीवर मदत न करता केवळ स्व कर्तृत्वावर तीन दिवस अन्नछत्र चालवले जाते. त्याचे उद्‍घाटन उद्या सकाळी होणार आहे.

पोलिस बंदोबस्त

चैत्र यात्रेसाठी २ पोलिस अप्पर अधिकारी, ५ उपअधीक्षक, १३० पोलिस अधिकारी, ९०० पोलीस, ७०० होमगार्ड तसेच सेवाभावी संस्थांचाही बंदोबस्त तैनात आहे. डोंगरावर बंदोबस्त लावला आहे.

आरोग्य पथके सज्ज

सीपीआर, व्हाईट आर्मी सनराइज तसेच इतर सेवाभावी संस्थांची अरोग्य पथके सज्ज आहेत. मुख्यमंदिर व परिसर सेंट्रल प्लाझा यमाई मंदीर गायमुख तला व या ठिकाणी ही पथके असतील.

तहसीलदार शेंडगे यांना पूजेचा चौथ्यांदा मान

चैत्र यात्रेत शासकीय पूजेचा मान तहसीलदारांना असतो. सलग चार वेळा पूजेचा मान मिळणारे तहसीलदार रमेश शेंडगे पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यांचे मूळगाव पेड (ता. तासगाव) असून, २०१९ पासून पन्हाळ्याचे तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत.

अमृतनगरमध्ये उद्या भाविकांसाठी महाप्रसाद

कोडोली : चैत्र यात्रेनिमित्त शनिवारी (ता. १६) अमृतनगर येथे वाठार ते बोरपाडळे हॉटेल मालक असोसिएशनतर्फे भाविकांसाठी महाप्रसाचे भव्य आयोजन केल्याची माहिती असोसिएनचे अध्यक्ष अरुण बजागे व शिवाजी सिद यांनी पत्रकार परिषदेत दिली. पन्नासहून अधिक हॉटेल चालक मालक असोसिएशनची स्थापना केली असून सामाजिक बांधिलकी म्हणून भाविकांसाठी यावर्षी महाप्रसाद वाटपाची आयोजन केले असून अमृतनगर येथील जयरत्न हॉटेल शेजारी हा कार्यक्रम होणार असल्याचे प्रविण पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT