Kolhapur Main Rajaram migration guardian minister deepak kesarkar resignation  
कोल्हापूर

Kolhapur : कोल्हापूरकरांना केसरकरांनी फसविले? , पालकमंत्री बदलण्याच्या मागणीला जोर

कोल्हापूरचे वैभव आणि ऐतिहासिक ठेवण असलेल्या मेन राजारामच्या स्थलांतर घाट घातल्यानंतर कोल्हापूरकरांनी लढा आणखी तीव्र

धनश्री ओतारी

मेन राजाराम हायस्कूल बंद करून ही जागा ताब्यात घेऊन तेथे भाविकांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी उपयोगात आणण्याचा पालकमंत्री दीपक केसरकर यांचा मानस होता. मात्र ही जागा संपादित करण्यासाठी सर्वच स्तरांतून विरोध झाल्याने ही योजना बारगळली. त्यानंतर केसरकर यांनी या शाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. पण, ते झाले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी फसविल्याची भावना कोल्हापूरकरांच्या मनात असून, पालकमंत्री बदला, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.(Kolhapur Main Rajaram migration guardian minister deepak kesarkar resignation )

मेन राजाराम हायस्कूलही केवळ एक ऐतिहासिक इमारत नाही. तर या संस्थेशी कोल्हापूरकरांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या शाळेच्या स्थलांतरणाला सर्वांनी विरोध केला. शासनाने जरी हे स्थलांतर रद्द केले असले तरी अजून या शाळेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही.

शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

तसेच शाळेच्या प्रॉपर्टी कार्डाला जिल्हा परिषदेचे नावही लावलेले नाही. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फसवले असल्याची भावना कोल्हापुरकरांत निर्माण झाली आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरकरांना दिलेले कोणतेही आश्‍वासन पाळलेले नाही. मेन राजाराम हायस्कूलसाठी निधी देतो. या शाळेच्या प्रॉपर्टी कार्डला जिल्हा परिषदेचे नाव लावणे ही आश्‍वासने म्हणजे वल्गनाच ठरल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री हटाव, अशीच आमची मागणी आहे.

- ॲड. बाबा इंदुलकर, अध्यक्ष, कॉमनमॅन संघटना

मेन राजाराम हायस्कूल या ठिकाणी हॉटेल सुरू करण्याचा त्यांचा हेतू साध्य झाला नाही. कोल्हापूरकरांनी हा उद्देश हाणून पाडला. त्यामुळे अचानक पालकमंत्र्यांनी आपली भूमिका बदलली. मेन राजाराम हायस्कूलमध्ये विविध उपक्रम सुरू करण्यासाठी निधी देतो, असे सांगितले. मात्र, अद्याप त्यांनी निधी दिलेला नाही. तसेच, प्रॉपर्टी कार्डलाही जिल्हा परिषदेचे नाव लागलेले नाही. त्यांचा हेतू साध्य न झाल्याने त्यांनी मेन राजाराम हायस्कूलकडे दुर्लक्ष केले आहे.

- दिलीप देसाई, अध्यक्ष, प्रजासत्ताक

पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूरबद्दल आस्था नाही. त्यामुळे इथल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात ते तत्परता दाखवत नाहीत. मेन राजाराम हायस्कूलच्या प्रश्‍नावर आपल्यावरचे बालंट झटकण्यासाठी त्यांनी निधी देतो, प्रॉपर्टी कार्डला जिल्हा परिषदेचे नाव लावतो, असे सांगितले. पण, प्रत्यक्षात काहीच केले नाही. ते जनतेशी खोटे बोलले. त्यांना पालकमंत्रिपदावरून हटविले पाहिजे. यासाठी आता कोल्हापूरकरांनी लढा उभारला पाहिजे.

- टी. व्ही. नलावडे, निवृत्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT