kolhapur municipal corporation decorate public toilet for temporary kolhapur marathi news 
कोल्हापूर

अहो दादा... हे सार्वजनिक शौचालय आहे की शुटिंगचा सेट...?

मोहन मेस्त्री

कोल्हापूर - आतापर्यंत शौचालयात जाताना नाकाला रुमाल लावून पायऱ्यावरुन जपून जायला लागायचे, तेथे आज चक्क लोखंडी रॅंप लागला. बल्ब लागले होते आणि सकाळी सूर्यप्रकाश असूनही दिव्यांचा उजेडा पडला होता. बाहेर लोखंडी स्टॅंडवर वॉशबेसीन आणि आरसा लावलेला, जवळच हॅंडवॉशची बाटली आणि एअर फ्रेशनरचे बंद पाकीट होते. बेसिनजवळ दोनचार नवीन प्लास्टिकच्या  बादल्या आणि कचऱ्याची नवी बादलीही होती. या सर्व झगमगाटामुळे या शौचालयाचे रुप रोज पाहणाऱ्यांना नागरिकांनी मात्र ही सजावट करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना  ‘दादा शूटिंग आहे का? ’ असा प्रश्‍न विचारला. या प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे की हसायचे, याचे कोडे न सुटल्याने कर्मचाऱ्यांनी साहेबांकडे बोट दाखवले. साहेबांनी पण उत्तर दिले नाही. पण तासाभरात त्या ठिकाणी  ११ वाजता हा देखावा पाहण्यासाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि हातात फाईल घेतलेले कर्मचारी आले. त्यांनी पाहिले आणि ते गेले, पुन्हा तेथील माणसांना नेहमीचे शौचालय नजरेस पडले. मग लोकांना कळाले की हे शूटिंग नसले तरी देखावा मात्र नक्‍कीच होता.

समिती आली, शौचालय सजले

संभाजीनगर बसस्टॅंड जवळील सुधाकर जोशी नगरातील सार्वजनिक शौचालयात हा डेमो खरेतर केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रिय गुणवत्ता निरिक्षण समितीला दाखवण्यासाठी केला होता. शहराला ‘ओडीआर’ प्लस मानांकन देण्यासाठी पाहणी करण्यासाठी ही कमिटी आली आहे. समिती येण्याअगोदर तासभर हा देखावा सुरू करण्यात येतो. यासाठी पूर्ण शहरातील सार्वजनिक शौचालयांसाठी दोन  लोखंडी रॅंप केले आहेत. दोन बेसीन आणि बेसीन स्टॅंड एक्‍झॉस्ट फॅन, आरसा, हॅंड वॉश बाटली, दोन फुटंचा आरसा, अशी सुविधा केलेली असते. इतकेच नाही इतर वेळी या शौचालयांना लाईटचा उजेड माहीत नसतो, पण लांबलचक वायर होल्डरच्या सहाय्याने बल्ब शेजारच्या घरातुन जोडून घेतलेले होते.इतकेच नाही तर सॅनिटरी वेडिंग मशीनही येथे लावण्यात आले होते.

अन् दुपारीच सेट बदलला

अनेक महिला या मशिनला ए.सी. समजून हा एसी बाहेर का लावलाय अशी चौकशी करत होत्या. शौचालयाच्या आजुबाजूला सफ़ाई केली होती. पण हे सुशोभिकरण नागरीकांना काही कालावधीकरिताच अनुभवता आले.  कारण  ११ वाजताच येथील सर्व साहित्य काढून महापालिका कर्मचाऱ्यांनी  गाडीत भरले आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत नेले तेथील सार्वजनिक शौचालय सजवण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Election : पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील पराभूत कसे पराभूत झाले ? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

Krishna Khopde : पूर्व नागपुरात ‘कृष्ण कमळ’ ला तोड सापडेना, सलग चौथ्यांदा विजय : कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादीही हतबल

Rahul Kul: आमदार राहुल कुल यांची अनोखी हॅटट्रीक; मंत्रीपदाचा वनवास कधी संपणार?

SCROLL FOR NEXT