कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. 15 जानेवारी 2021 पर्यंतच्या अस्तित्वात असलेली विधानसभा निवडणुकीची यादीच अंतिम ग्राह्य धरली जाणार असून आता या मतदार यादीप्रमाणे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.
2020 मध्ये मुदत संपलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झाली असून त्याकरिता मतदार यादी संदर्भात कार्यक्रम दिला आहे.
एप्रिल-मे 2021 मध्ये होणा-या कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2021 करिता राज्य निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाची अधिसुचने द्वारे 15 जानेवारी, 2021 ही Cut-off date जाहीर केली आहे, त्या दिवशी (म्हणजचेच दि.15जानेवारी 2021 रोजी) अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादीच सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येईल असे आदेश देण्यात आलेले आहेत.
तसेच दि. 15 जानेवारी 2021 मतदार यादी ग्राहय धरुन कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2021 मतदार यादीचा कार्यक्रम राहील.
हे पण वाचा - गोकुळ, केडीसीत घुमशान ; निवडणुकीचा बिगुल वाजला
1. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे : 16फेब्रुवारी 2021
2. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचन दाखल करण्याचा कालावधी : 16फेब्रुवारी 2021 ते 23 फेब्रुवारी
3. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे : : 03 मार्च 2021
4. मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे. : 08 मार्च 2021
5. अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार : 12 मार्च 2021
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.