कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 4 हजार 175 जणांकडून 4 लाख 62 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच रात्री 9 नंतर आस्थापना सुरु न ठेवणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल गेल्या आठवड्यात म्हणजे 11 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत महापालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून 4 हजार 175 जणांकडून 4 लाख 62 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
यामध्ये 11 ते 17 नोव्हेंबर 2020 या सात दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाने 4 हजार 175 जणांकडून वसूल केलेल्या 4 लाख 62 हजार 800 रुपयांच्या दंडामध्ये 11 नोव्हेंबरला 670 जणांकडून 78 हजार 600, 12 नोव्हेंबरला 598 जणांकडून 66 हजार 300, 13 नोव्हेंबरला 530 जणांकडून 65 हजार 300, 14 नोव्हेंबरला 437 जणांकडून 49 हजार 100, 15 नोव्हेंबरला 705 जणांकडून 75 हजार 100, 16 नोव्हेंबरला 735 जणांकडून 73 हजार 100 आणि 17 नोव्हेंबरला 500 जणांकडून 55 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्क व सामाजिक अंतराचे पालन करा ; आयुक्त
कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने नो मास्क नो एंन्टी ही मोहिम शहरात गतीमान केली असून विनामास्क फिरणारे तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.