radha nagari  sakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Update : ‘राधानगरी’चा स्वयंचलित दरवाजा उघडला, राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली

जोरदार पावसाचा दिलासा राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज रात्रीपासून जोरदार हजेली लावली. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून, धरणातून २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा आज पुन्हा पाण्याखाली गेला असून यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, बारा तासांत पंचगंगा नदीची पाणी पातळी एक फुटाने वाढली असून, सध्या नदीची पाणी पातळी १७ फूट ६ इंच एवढीझाली आहे.

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचा मोठा परिणाम पिकांवर होत राहिला. ओढे, ओहळांमधील वाहणारे पाणी बंद झाले होते. आज पुन्हा एकदा ओढे आणि नाले भरुन वाहत आहेत. माळरानातील भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर पिकांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यातील तब्बल ४० हजार हेक्टरहून अधिक पिके पावसाअभावी धोक्यात आली होती. आजच्या पावसामुळे थोडासा का असेना दिलासा मिळाला आहे.

आज पहाटे चार वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित एक दरवाजा उघडला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. धरणातून सध्या २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढत आहे. आज दिवसभर राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. इतर तालुक्यांत मात्र तुरळक पावसाने हजेरी लावली आहे.

कुंभी धरण १०० टक्के भरले

गगनबावडा : गेले तीन दिवस सलग गगनबावड्यात जोरदार पाऊस पडला. घाटमार्ग, धरण क्षेत्र व पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प रविवारी पहाटे शंभर टक्के भरला. परिणामी धरणातून विद्युत निर्मितीसाठी ३०० क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरु करण्यात आला.

धरणात २.७१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणक्षेत्रात आजअखेर ४३६२ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर या तीन तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा हा गगनबावडा तालुक्यातील लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो.

उन्‍हाळ्यात बॅकवॉटर योजनेद्वारे धामणी खोरीतील गावांना या प्रकल्‍पाचा मोठा लाभ होतो. येथील पर्जन्यमापन केंद्रात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात १०४ मिलिमिटर, तर आजअखेर ४३६२ मिलिमिटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. दरम्‍यान, गगनबावडा तालुक्‍यात पडलेल्‍या दमदार पावसाने कोदे, अणदूर व वेसरफ ही सर्व लघुप्रकल्प यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT