गगनबावडा - करूळ घाटात संरक्षक कठडा तोडून दरीत झुकलेला टेम्पो दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. सुदैवाने भीषण अपघात टळला असून चालकाला देखील सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हा अपघात आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत पोलिस स्थानकात नोंद झाली नसली तरी टेम्पो बाहेर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो करूळ घाट चढत होता. एका वळणावर टेम्पो संरक्षक कठडा तोडून दरीत झुकलेल्या स्थितीत अडकून राहिला. टेम्पोचा पुढील भाग दरीत आणि मागील भाग रस्त्यावर होता. मात्र, टेम्पो चालकांची केबिन पूर्णतः दरीत झुकलेली होती. कोणत्याही क्षणी हा टेम्पो दरीत कोसळू शकेल, अशी स्थिती होती.
हा प्रकार इतर वाहनचालकांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी टेम्पोला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घाट उतरत असलेल्या एका ट्रकला थांबवून दोरखडांच्या सहाय्याने टेम्पोला मागे ओढण्यात आले. टेम्पो सुरक्षित बाहेर काढण्यात आला. या अपघाताची नोंद पोलिस स्थानकात झालेली नाही. मात्र, अडकलेला टेम्पो बाहेर काढण्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरला झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.