कोल्हापूर : कायदा सुव्यवस्थाच नव्हे, तर पूरपरिस्थितीची माहिती जलदगतीने ट्विटरवरून (twitter) देण्याचे महत्त्वपूर्ण काम जिल्हा पोलिस (kolhapur police)दलाने केले. यातून नागरिकांना जिल्ह्यातील कोणते मार्ग बंद, कोणते मार्ग सुरू आहेत, याची माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी (traffic updates) लावता आला. तसेच नागरिकांचे हालही टाळता आले.
महापुरात (kolhapur flood) अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला. महामार्गही बंद झाला; पण पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस दल कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सज्ज होते. या काळात प्रत्येकाला सुरक्षित व लवकर आपल्या घरी जायचे होते. अनेकांना आपले नातेवाईक अडकू नयेत, याची काळजी होती. अशा काळात पोलिस यंत्रणा अधिकच अपडेट झाली.
कोणत्या भागात पुराचे पाणी आहे, त्याची पाणी पातळी किती आहे, कोणते मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. त्याला कोणते पर्यायी मार्ग आहेत की नाहीत, नागरिकांनी काय दक्षता घ्यावी, या संबंधीची सर्व माहिती पत्रकाबरोबर ट्विटरवर देण्याचे काम पोलिस दलाने सुरू केले. वेगवेगळ्या टप्प्यात ही माहिती देण्याची प्रक्रिया अखंडित सुरू ठेवली. त्यामुळे पुणे, मुंबई, गुजरात, गोवा मार्गे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना याची माहिती वेळेत मिळण्यास मदत झाली. त्यांनी संभाव्य धोके विचारात घेऊन प्रवास करणे टाळले. या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतुक केले. त्याबाबतच्या प्रतिक्रियाही त्यांनी खुद्द पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे ट्विटद्वारे व्यक्त केल्या.
हेल्पलाईन २४ तास उपलब्ध
पुराच्या काळात नागरिकांना येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हा पोलिस दलाची हेल्पलाईन तीन सत्रात २४ तास उपलब्ध होती. त्यामुळे नागरिकांच्या वेळेत अडचणी सोडवून मदत पोहचविण्याचे कार्य जिल्हा पोलिस दलाने केले.
"आपत्ती व्यवस्थापनात सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्यास संभाव्य धोके टाळता येतात. ट्विटर हॅन्डलरद्वारे पूरस्थितीची माहिती सातत्याने देत राहिल्याने जिल्ह्याबाहेरील नागरिकांना पुराची नेमकी स्थिती समजली. त्यामुळे त्यांनी शहरात येणे टाळले. पर्यायाने व्यवस्थेवरील ताण कमी झाला."
- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.