'बिद्री कारखान्यात झालेल्या पराभवात पाठीशी न राहता ज्यांना आतापर्यंत वैयक्तिक विचार न करता मोठे केले, तेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले हे मोठे दुःख आहे.'
सरवडे : ‘राधानगरी-भुदरगड तालुक्याच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढवणारच,’ अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांनी केली. सोळांकूर (ता. राधानगरी) येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
‘पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) व माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांनी विधानसभा व बिद्री कारखान्याच्या अध्यक्षपदाचा शब्द देत नेहमी मला फसवत माझे राजकारण संपविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
ए. वाय. पाटील म्हणाले, ‘राजकारण करत असताना मी नेहमीच पक्षवाढीसाठी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांला मोठा करण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेऊन पायाला भिंगरी बांधून दिवस-रात्र राबलो. बिद्री कारखान्यात झालेल्या पराभवात पाठीशी न राहता ज्यांना आतापर्यंत वैयक्तिक विचार न करता मोठे केले, तेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले हे मोठे दुःख आहे. या लोकांना जनता माफ करणार नाही. तालुक्यातील स्वाभिमानी जनता माझीच पाठराखण करेल.’
यावेळी शिवाजी पाटील, नेताजी पाटील, प्रकाश पोवार, राजू कवडे, मानसिंग पाटील, महादेव कोथळकर, अविनाश पाटील, विलास हळदे , संभाजी देसाई, आदींची भाषणे झाली. यावेळी डी. बी. पाटील, भगवान पातले, मोहन पाटील, के. डी. चौगले, दीपक पाटील, अमर पाटील, विजय तौंदकर, बाळू धोंड, बबन जाधव, सोनू आरडे, तानाजी काटकर, वाय. डी. पाटील, रघुनाथ जाधव, अशोक पाटील, जयसिंग हुजरे, आदी उपस्थित होते. रामराव इंगळे यांनी स्वागत केले. संग्राम कदम यांनी आभार मानले.
ए. वाय. पाटील म्हणाले, ‘बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील यांनी केवळ मते मिळविण्यासाठी ९० दिवसांच्या आत नोकर भरती करणार, असे आश्वासन दिले होते. त्यातील साठ दिवस पूर्ण झाले आहेत. तरी देखील नोकरभरतीच्या कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. के.पीं. नी नोकर भरती करून लोकांना दिलेला शब्द पाळावा.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.