Kolhapur politics South North Assembly Constituency esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : 'दक्षिणे'त सुरू झालं 'उत्तरायण'; पाटील विरुद्ध महाडिक लढतीत आता शिवसेनेच्या क्षीरसागरांची उडी?

क्षीरसागर यांचा मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे.

लुमाकांत नलवडे

खासदार धनंजय महाडिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिकच असतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

कोल्हापूर : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे प्रतिष्ठेच्या कोल्हापूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात आता ‘उत्तरायण’ दिसू लागले आहे. आमदार सतेज पाटील (Satej Patil) ते आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) व्हाया माजी आमदार अमल महाडिक असे या मतदारसंघाचे नेतृत्व राहिले आहे.

याच मतदारसंघावर आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची नजर पडली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघात आता कॉंग्रेसचे नेतृत्व आहे.

त्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्यामुळे क्षीरसागर यांना ‘दक्षिणोत्तर’ नजर फिरवावी लागत आहे. राज्यातील मोजक्या मतदारसंघातील लढती चर्चेच्या ठरतात. यापैकी दक्षिण मतदारसंघ एक आहे. याच मतदारसंघात यापूर्वी माजी मंत्री, खासदार, आमदारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. त्यामुळे हा मतदारसंघ दीर्घकालीन चर्चेत राहिला.

आमदार ऋतुराज पाटील हे ‘उत्तर’मधून लढणार अशी हवा करून ते ‘दक्षिण’ मध्ये फिरले. तेथून विजयीही झाले. पुढे महाविकास आघाडी झाली आणि कट्टर शिवसैनिक असलेले क्षीरसागर यांना पोटनिवडणुकीत उत्तरमध्ये कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांचा प्रचार करावा लागला. त्यामुळे उत्तर मतदारसंघही आता त्यांचा राहिलेला नाही.

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्याचे पडसाद आता दक्षिण आणि उत्तरमध्ये दिसू लागले. ‘उत्तर’साठी नेहमीच शड्डू ठोकून आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असलेल्या क्षीरसागर यांचा मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे येथे त्यांचा उमेदवार यापूर्वी होता. त्यामुळे क्षीरसागर यांनी महापालिका हद्दीतील पण ‘दक्षिण’ मध्ये असलेल्या प्रभागात अधिक निधी दिला आहे. आपला प्रभाव तेथे दाखवायला सुरुवात केली आहे. प्रसंगी ‘दक्षिण’ मधून शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. याचवेळी ‘उत्तर’ ही हातून निसटू नये म्हणून आता ‘दक्षिणोत्तर’ असा प्रवास सुरू केला आहे.

खासदार महाडिक यांचे सूचक वक्तव्य

खासदार धनंजय महाडिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिकच असतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘दक्षिणे’त आता ‘उत्तरायण’ सुरू झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT