Loksabha Election Voting sakal
कोल्हापूर

Loksabha Election Voting : कोल्हापूरचे मतदान ७१.५९ टक्के;हातकणंगलेचे ७१.११ टक्के, मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांतील मतदान पूर्ण झाले असून, निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूर मतदारसंघात ७१.५९ टक्के, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ७१.११ टक्के मतदान झाले आहे.

राज्यात मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक गडचिरोली जिल्ह्याचा असून, तेथे ७१.८८ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे मतदान पाच टप्प्यात पूर्ण झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सर्व लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.

यामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा आहे. गतवेळीप्रमाणे याही निवडणुकीत जिल्ह्याने मतदानामध्ये अग्रस्थान कायम ठेवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पहिला टप्पा

  • भंडारा- गोंदिया ६७.०४

  • चंद्रपूर ६७.५५

  • गडचिरोली -चिमूर ७१.८८

  • नागपूर ५४.३२

  • रामटेक ६१.०१

दुसरा टप्पा

  • अकोला ६१.७९

  • अमरावती ६३.६७

  • बुलडाणा ६२.०३

  • हिंगोली ६३.६४

  • नांदेड ६०.९४

  • परभणी ६२.२६

  • वर्धा ६४.८५

  • यवतमाळ-वाशीम ६२.८७

तिसरा टप्पा

  • बारामती ५९.५०

  • हातकणंगले ७१.११

  • कोल्हापूर ७१.६९

  • लातूर ६२.५९

  • माढा ६३.६५,

  • उस्मानाबाद ६३.८८

  • रायगड ६०.५१

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग ६२.५२

  • सांगली ६२.२७

  • सातारा ६३.१६

  • सोलापूर ५९.१९

चौथा टप्पा

  • नगर ६६.६१

  • औरंगाबाद ६३.०३

  • बीड ७०.९२,

  • जळगाव ५८.४७

  • जालना ६९.१८

  • मावळ ५४.८७

  • नंदूरबार ७०.६८

  • पुणे ५३.५४

  • रावेर ६४.२८

  • शिर्डी ६३.०३

  • शिरूर ५४.१६

पाचवा टप्पा

  • वंडी ५९.८९

  • धुळे ६०.२१

  • दिंडोरी ६६.७५

  • कल्याण ५०.१२

  • उत्तर मुंबई ५७.०२

  • उत्तर मध्य मुंबई ५१.९८

  • ईशान्य मुंबई ५६.३७

  • वायव्य मुंबई ५४.८४

  • दक्षिण मुंबई ५०.०६

  • दक्षिण पश्चिम मुंबई ५३.६०

  • नाशिक ६०.७५

  • पालघर ६३.९१

  • ठाणे ५२.०९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Indian Air Force च्या Air Show मध्ये चार जणांचा मृत्यू, ९६ जण जखमी, घटनेनं खळबळ

IND vs BAN: भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्ह्युवमध्ये अडकले बांगलादेशी फलंदाज! सूर्याच्या शिलेदारांसमोर १२८ धावांचे लक्ष्य

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE: सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता, वाचा ग्रँड फिनालेमध्ये नेमकं काय काय घडलं

SCROLL FOR NEXT