Kolhapur  Sakal
कोल्हापूर

Kolhapur : अमृत एक योजनेतून रंकाळ्याचे प्रदूषण थांबणार

ड्रेनेज लाईनचे काम अंतिम टप्प्यात; मैलामिश्रित सांडपाणी रोखणार

उदयसिंग पाटील

कोल्हापूर : पावसाच्या पाण्याबरोबर पाणलोटमधील ‘सेफ्टीटॅंक’चे मैलामिश्रित सांडपाणी रंकाळा तलावात मिसळून होत असलेले प्रदूषण मार्चअखेरपर्यंत थांबण्याची शक्यता आहे. त्यासाठी अमृत एक योजनेतून दुधाळी, रंकाळा तलावाच्या पाणलोटमध्ये मंजूर झालेल्या ८० किलोमीटरच्या ड्रेनेज लाईनपैकी ६५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम होताच केवळ पावसाचे पाणी रंकाळा तलावात येईल. परिणामी, मोठ्या प्रमाणात प्रदूषण थांबणार आहे. याबरोबरच तलावातील पाण्याची गुणवत्ता वाढीसाठी अमृत दोन योजनेतून तयारी केली जात आहे.

रंकाळा तलावात शेजारील नाल्यातून येणारे सांडपाणी थांबण्यासाठी स्वतंत्र निधी खर्च केला. त्यातून रंकाळा भोवतीने ड्रेनेज लाईन टाकून ती दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेली. यातून नाल्यातील सांडपाणी प्रकल्पापर्यंत नेले जात होते. पावसाळ्यात मात्र नाले थेट तलावात मिसळत होते. पाणलोटमधील नागरी वस्तीत ड्रेनेज लाईन नसल्याने पावसाच्या पाण्याबरोबर सेफ्टी टॅंकचे मैलामिश्रित सांडपाणी तलावात येत होते. हा प्रकार रोखण्यासाठी अमृत एकमधील प्रस्तावातून रंकाळा पाणलोटमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली.

त्याचबरोबर इतर सहा नाले वळवणे, त्यासाठीची पाईपलाईन टाकणे आदी कामेही होती. रंकाळा पाणलोटमधील मैलामिश्रित सांडपाणी येऊ नये, यासाठी ८० किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. सध्या त्यातील ६५ किलोमीटरची लाईन टाकून पूर्ण झाली आहे. उर्वरित १५ किलोमीटरचे काम मार्चपर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यानंतर वैयक्तिक जोडण्या होऊन घरातील सांडपाणी गटरद्वारे नाल्यात न येता प्रक्रिया प्रकल्पाकडे जाईल. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर गटारीतून मैलामिश्रित सांडपाणी रंकाळ्यात येणे बंद होणार आहे. ड्रेनेज लाईनबरोबर वैयक्तिक जोडणी व्यवस्थित होणे गरजेचे आहे.

‘रंकाळा, लक्षतीर्थ’साठी प्रयत्न

अमृत दोन योजनेतून तलावातील जलचर तसेच वनस्पती यांना धोका न पोहचवता पाण्याची गुणवत्ता राखण्याची कामे होणार आहेत. पेटंट घेतलेल्या काही एजन्सीजना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेने संदीप गुरव असोसिएट या सल्लागार कंपनीसोबत काही एजन्सीबरोबच चर्चा चालवली आहे. त्यांच्याकडून योग्य हमी मिळाल्यानंतरच पाणी गुणवत्ता राखण्याच्या कामाचे प्रस्ताव केले जाणार आहेत. सध्या रंकाळा तलावासाठी १३ कोटी, तर लक्षतीर्थ तलावासाठी साडेपाच कोटी रुपयांच्या प्रस्तावांना तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT