kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Flood Update : आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘केडीएमजी’ सज्ज

‘सेंट्रल किचन’ची तयारी; ३५० स्वयंसेवकांचे पथक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात पुराची आपत्ती निर्माण झाल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासन तसेच पूरबाधितांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप (केडीएमजी) सज्ज आहे. या ग्रुपमध्ये कोल्हापुरातील विविध शंभर संस्था संघटित झाल्या आहेत. सुमारे ३५० स्वयंसेवकांची टीम मदत कार्यासाठी तयार आहे.

कोल्हापुरात सन २०१९ मधील महापुराच्या आपत्तीवेळी ‘केडीएमजी’ची स्थापना झाली. त्यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, क्रिडाई कोल्हापूर अशा १०० संस्था, संघटनांचा समावेश आहे. पूरबाधितांना जेवण, वैद्यकीय सेवा, औषध पुरवठा, स्वच्छता, पडझड झालेल्या घरांची बांधणी आदी विविध स्वरूपातील मदतकार्य या ग्रुपने केले. सन २०२० मधील पूर आणि कोविडच्या कालावधीत देखील मदतकार्य केले.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी दिवसागणिक वाढत आहे. ते लक्षात घेऊन संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मदतकार्यासाठी ‘केडीएमजी’ तयार आहे. दरम्यान, कोल्हापूर हॉटेल मालक संघाने देखील पूरबाधित आणि त्यांच्यासाठी मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांना जेवण पुरविण्यासाठी ‘सेंट्रल किचन’चा उपक्रम राबविला होता.

यावर्षी देखील गरज निर्माण झाल्यास ‘सेंट्रल किचन’ सुरू करण्याची तयारी केली असल्याची माहिती या संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी दिली.कोल्हापूर जिल्ह्यात पुराची आपत्ती निर्माण झाल्यास मदतकार्य करण्यासाठी ‘केडीएमजी’ सज्ज आहे. सुमारे ३५० स्वयंसेवकांची टीम तयार आहे.’

इंद्रजित नागेशकर, विश्‍वस्त, केडीएमजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT