Kolhapur Rain Update Sakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Update : जिल्ह्यात २१ हजार हेक्टरमधील पिके पुरात; ३०० हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना फटका

Kolhapur latest news in marathi |दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पावसाची उघडीप असली तरीही जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांमधील २१ हजार हेक्टर पिकाऊ शेती पूर्णपणे पुरात बुडाली आहे.

सुनील पाटील

कोल्हापूर : दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पावसाची उघडीप असली तरीही जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांमधील २१ हजार हेक्टर पिकाऊ शेती पूर्णपणे पुरात बुडाली आहे. यात ऊस, भात, सोयाबीन पिके गुदमरत आहेत. आणखी काही दिवस पुराचे पाणी ओसरले नाही, तर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अतिवृष्टी सुरू आहे. धरणांचा पाणीसाठा पूर्णक्षमतेने झाला आहे. एकीकडे धरणांचे दरवाजे उघडलेले आणि दुसरीकडे वरुणराजाची अवकृपा यामुळे नदीतील पाणी पात्राबाहेर पडत ते गावागावांत आणि शहरी वसतींमध्ये शिरले आहे.

कालपासून पावसाने उसंत घेतल्याचा दिलासा आहे; पण पूर ओसरण्‍याचे नाव घेत नाही. इंचा-इंचाने पुराचे पाणी कमी होत असले तरीही गेल्या सात ते आठ दिवसांपासून नदीकाठच्या शेतात पुराच्या पाण्यात घुसमटणाऱ्या पिकांना वाचवणे मुश्‍कील झाले आहे.

सुरळीत पाणी गेल्याने आणाखी काही दिवस उसाचे पीक पाण्यात राहिल्यास त्यांचा पाला कुजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीकाठीच बसून पुराचे पाणी कमी होते का हे पाहण्याशिवाय पर्याय नाही. पंचगंगा नदी तीरावर असणाऱ्या करवीर, गगनबावडा, हातकणंगले, शाहूवाडी व शिरोळ तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला आहे. दूधगंगा, कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने हजारो हेक्टर पिकाऊ शेती आपल्या कवेत घेतली आहे.

सर्वाधिक शेतीला फटका बसलेली गावे

करवीर तालुका : आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे, बालिंगे, पाडळी खुर्द, वडणगे, शिंगणापूर, केर्ली, पाडळी बुद्रुक, आडूर, चिंचवाड, गांधीनगर, आरळे, कळंबे तर्फ कळे, नागदेववाडी, सांगरूळ, कुडित्रे, केर्ली, शिये, कोपार्डे, केर्ले, आमशी,

कांचनवाडी, कांडगाव, खाटांगळे, गाडेगोंडवाडी, चाफोडी, देवाळे, निगवे दुमाला, पासार्डे, भुये, शिंदेवाडी, शेळकेवाडी, वसगडे, भुयेवाडी, कसबा बीड, परिते, चिंचवडे तर्फ कळे, घानवडे, खुपीरे, सडोली दुमाला, सडोली खालसा, शिरोली दुमाला, महे, हसूर, सावरवाडी, साबळेवाडी, रजपूतवाडी, हळदी.

गगनबावडा तालुका : साळवण, वेतवडे, तळये बुद्रुक, मार्गेवाडी, शेणवडे, खोकुर्ले, लोंघे, मांडुकली, मणदूर, निवडे, असंडोली, साखरी, वेसर्डे, कडवे, कोदे बुद्रुक, मुटकेश्र्वर, किरवे, बावेली, कारिवडे, अणदूर, सांगशी, जर्गी बावेली, आसळज, कातळी, बोरबेट, शेळोशी, धुंदवडे आणि गगनबावडा.

राधानगरी तालुका : सोन्याची शिरोली, आवळी बुद्रुक, गुडेवाडी, तारळे खुर्द, कंथेवाडी, आवळी खुर्द, आणाजे, गुडाळ, कसबा तारळे, करंजफेण, मानबेट, फेजिवडे, गवशी, म्हासुर्ली, घोटवडे, कोनोली तर्फ असंडोली, धामोड, कोते, चांदे, येळवडे, राशिवडे बुद्रुक, कौलव, बरगेवाडी, शिरसे, आमजाई व्हरवडे, पुंगाव, राशिवडे खुर्द, शिरगाव, पिरळ, राधानगरी, कुडुत्री आणि पाडळी.

हातकणंगले तालुका : शिरोली पुलाची, हुपरी, रुकडी, माणगाव, चोकाक, हालोंडी, रेंदाळ, रुई, इंगळी, अतिग्रे, चंदूर, कबनूर, हातकणंगले, रांगोळी, पट्टण कोडोली, साजणी, टोप आणि तिळवणी.

शिरोळ तालुका : शिवनाकवाडी, शिरदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, धरणगुत्ती, नांदणी, शिरढोण, टाकवडे, तेरवाड, हेरवाड, हरोली, जांभळी, अब्दुललाट, लाटवाडी.

पन्हाळा तालुका : पोर्ले तर्फ ठाणे, पोंबरे, पुनाळ, किसरुळ, पडसाळी, कोलोली, बाजार भोगाव, तिरपण, यवलूज, कसबा ठाणे, बोरपाडळे.

शाहूवाडी तालुका : माळापुडे, कातळेवाडी, पेंडाखळे, करंजफेण, पाल, मोसम, गेळवडे, मरळे व पारिवणे.

जिल्ह्यात अतिवृष्टीने पूर आला आहे. या पुरात ३०० हून अधिक गावांतील वीस हजार हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. पुराचे पाणी कमी होताच पंचनामा केला जाणार आहे. या शेतात भात, सोयाबीन, ऊस अशी पिके आहेत. पाणी कमी झाल्यानंतरच त्या पिकांची स्थिती समजणार आहे.

- अजय कुलकर्णी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT