kolhapur rain update panchganga river water towards ichalkaranji city Old bridge close administration on alert mode Sakal
कोल्हापूर

Ichalkaranji Flood Alert : इचलकरंजीत पाणी नागरी वस्तीच्या दिशेने; शहरातील जुना पूल वाहतुकीस बंद, प्रशासन अलर्ट मोडवर

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रातील पाणी शहरातील नागरी वस्तीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नजीकच्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतर करण्याबाबत सूचना दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली जात असून, प्रत्येक चार तासानंतर महापालिका प्रशासनाकडून संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

आज सकाळी जुन्या पुलावर पाणी आले आहे. मात्र, यापूर्वीच हा पूल वाहतुकीस बंद केला आहे. पुराचे पाणी शहरातील नागरी वस्तीच्या दिशेने झपाट्याने पसरत आहे. अगदी लक्ष्मी मंदिरपर्यंत पाणी आले आहे. नजीकच नागरी वस्ती आहे. दुपारीच ६१ फुटाची पातळी ओलांडली होती. रात्रीच्या सुमारास दीड ते दोन फुटांनी पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

गुरूकन्नननगरमध्ये घराची भिंत कोसळली

पावसामुळे गुरुकन्नननगरमध्ये एका घराची भिंत कोसळली. यामध्ये बेबीताई आप्पासो विभूते (वय ७८) या सुदैवाने बचावल्या. रविवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.

लिंबू चौक परिसरातील गुरूकन्नननगरमधील एका घराची भिंत कोसळली. या घरात विभूते या राहतात. परिसरात त्यांचे अन्य नातेवाईक राहतात. त्यांची मुलगी पुष्पा सांयकाळी घरी आल्या होत्या. त्यामुळे त्या चहा करत असतानाच अचानक भिंत कोसळली.

यावेळी मुलगी पुष्पा यांनी आईला जोरात खेचले. त्यामुळे सुदैवाने त्या बचावल्या. त्यांना कोणतेही इजा झाली नाही. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेने दोघीही घाबरल्या. महापालिकेच्या आपत्ती निवारण यंत्रणेकडून मदत कार्य राबविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT