महापालिकेकडून कामाची पूर्तता करून द्या, रस्ते विकास प्रकल्पासाठी २०३.८२ कोटींचा निधी दोन टप्प्यांत देण्यास मंजुरी देण्याची मंत्री शिंदे यांनी तयारी दर्शवली.
कोल्हापूर : शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी २०३ कोटी ८२ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली. निधी दोन टप्प्यांत मिळेल. मंत्रालयातील बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मंजुरी दिली. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर)तून हा निधी मंजूर झाला आहे. बैठकीस पालकमंत्री सतेज पाटील, (satej patil) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, (hasan mushrif) राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, भूषण गगराणी, महेश पाठक, पांडुरंग जाधव उपस्थित होते. ऋतुराज पाटील व महापालिका अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.
चंद्रकांत जाधव यांनी नागपूर अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर रस्ते प्रकल्पासाठी १७८ कोटी ९७ लाखांच्या निधीची मागणी केली होती. शहरातील रस्त्याचे प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामुळे निधी कसा द्यायचा, असा प्रश्न नगरविकासचे सचिव महेश पाठक यांनी केला. यावेळी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, अन्य पूर्तता महापालिका महिन्यात करेल, अशी ग्वाही आमदार जाधव व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. महापालिकेची निवडणूक असल्याने रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
महापालिकेकडून कामाची पूर्तता करून द्या, रस्ते विकास प्रकल्पासाठी २०३.८२ कोटींचा निधी दोन टप्प्यांत देण्यास मंजुरी देण्याची मंत्री शिंदे यांनी तयारी दर्शवली. कोल्हापूर महापालिका ‘ड’ वर्गात आहे. यामुळे रस्ते विकास प्रकल्पाच्या निधीतील २५ टक्के रक्कम महापालिकेस भरावी लागते. कोरोनामुळे (covid-19) महापालिका आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे २५ ऐवजी १० टक्के निधी महापालिकेकडून घ्यावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
पाठपुराव्याचा दावा
आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी निधीसाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. तिघांनीही याबाबत मंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत.
६४ किलोमीटरचे रस्ते होणार
अमृत तसेच ड्रेनेजलाईन पाईपलाईनच्या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. तेही दुरुस्त होतील. सुमारे १९ किलोमीटरचे मुख्य रस्ते, १५ किलोमीटरचे उपरस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणारे तीस किलोमीटर, असे सुमारे ६४ किलोमीटरचे रस्ते या निधीतून होणार आहेत. महापालिकेने त्याचा मॅप केला आहे. आयआरबीने सुमारे ४० किलोमीटरचे रस्ते केले. नंतर टोलचे आंदोलन झाले. युती सरकारने टोल घालविला. आयआरबीनंतर पहिल्यांदाच रस्त्यांसाठी २०३ कोटींचा निधी मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.