Kolhapur Robbery Jewellery Shop esakal
कोल्हापूर

खळबळजनक! कोल्हापुरात दंगल सुरु असतानाच ज्वेलर्सवर भरदिवसा सिनेस्टाईल दरोडा; गोळीबारात मालकासह दोघे जखमी

Breaking Marathi News: सांगली पाठोपाठ कोल्हापुरात सशस्त्र दरोडा पडल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दरोडेखोरांकडे आधुनिक पद्धतीचे स्वयंचलीत पिस्तूल होते. त्यांनी दुकानात आणि बाहेर असे १५ राउंड फायर केले.

बालिंगा : भर दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या चौघा सशस्त्र दरोडेखोरांनी काल भरदिवसा गोळीबार करून येथील सराफ पेढीवर सुमारे पावणेदोन कोटींचा दरोडा टाकला. दरोडेखोरांनी (Robbery in Kolhapur) केलेल्या गोळीबारात व मारहाणीत दोघे जखमी झाले. त्यापैकी दुकान मालकाची प्रकृती गंभीर आहे.

चित्रपटातील दृश्याप्रमाणे घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सांगली पाठोपाठ कोल्हापुरात सशस्त्र दरोडा पडल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, दरोडेखोरांच्या शोधासाठी तपास पोलिसांची पथके विविध भागांत रवाना करण्यात आली आहेत.

करवीर तालुक्यातील बालिंगा गावात मुख्य रस्त्याच्या तिकटीवरील कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा पडला. दुकानाचे मालक रमेश शंकरजी माळी (वय ४०) आणि त्यांचे मेव्हुणे जितू मोड्याजी माळी (३०, दोघे रा. बालिंगा) अशी जखमींची नावे आहेत.

जितू गोळीबारात जखमी झाले असून, रमेश माळी यांच्या डोक्यात बेसबॉल स्टिकने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती अत्यावस्थ आहे. (Latest Marathi News)

दुकानातील तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख असा सुमारे एक कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटत पोबारा करताना दरोडेखोरांनी दुकानाबाहेर येऊनही गावकऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर दरोडेखोर कळे गावाच्या दिशेने पळून गेले. भर दुपारी १.४५ ते २.०० या दरम्यान हा प्रकार घडला. (Marathi Tajya Batmya)

याबाबत प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी : रमेश माळी यांचे बालिंगा मेन रोडवरील मुख्य बसस्टॉपजवळ कात्यायनी ज्वेलर्स आहे. त्यांना चार भाऊ असून, सर्वजण याच व्यवसायात आहेत.

आज दुपारी रमेश यांच्यासह त्यांचा मुलगा मुलगा पीयूष (वय १३) आणि त्यांचे मेव्हुणे जितू दुकानात होते. दुपारी १.४५ च्या दरम्यान दोन दुचाकींवरून चौघे कोल्हापूरच्या दिशेने दुकानासमोर आले. त्यातील दोघे मागे थांबले तर दोघे दुकानात घुसले.

पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी सारा माल द्या, असे धमकावले. दरोडेखोरांपैकी एकाने काउंटरवरच्या काचांवर गोळ्या झाडल्या व दागिन्याचे बॉक्स उचलण्यास सुरुवात केली. यावेळी जितू दुकानातील बेसबॉल स्टिक घेऊन दरोडेखोरांच्या अंगावर धावले.

दरोडेखोरांनी त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या व त्याला जखमी केले. त्याच्या हातातील स्टिक घेऊन त्यांनी रमेश यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे ते खाली पडले.

दरम्यान, गोळीबारच आवाज झाल्याने दुकानाबाहेर ग्रामस्थांची गर्दी होऊ लागली. हे लक्षात येताच एका दरोडेखोराने दुकानातून बाहेर येत ग्रामस्थांच्या दिशने हवेत गोळीबार केला. गर्दी वाढतच असल्याचे लक्षात आल्यावर सर्व दरोडेखोर मुद्देमाल घेऊन बाहेर आले.

दुचाकीवरून ते जाऊ लागले. एवढ्यात जखमी रमेश दुकानाबाहेर आले. त्यांच्या दिशेने दरोडेखेरांनी पिस्तूल रोखले. घाबरलेले रमेश पुन्हा दुकानात गेले व त्यांनी काचेचा दरवाजा बंद केला.

दरोडेखोरांनी काचेवर गोळीबार केल्याने दरवाज्याची अखंड काच त्यांच्या डोक्यात पडली. त्यामुळे ते जागीच बेशुद्ध झाले. त्यानंतर दरोडोखोर दुचाकीवरून कळे गावाच्या दिशेने गेले.

त्यांच्यावर ग्रामस्थांनी दगडफेक केली; मात्र दरोडेखोरांनी ग्रामस्थांच्या दिशेने दुचाकीवर उभारून गोळीबार केला. हा सारा प्रकार घडत असताना रस्त्यावरून वाहतूक सुरू होती; मात्र दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने वाहतूक थांबली. वाहतूक कोंडी झाल्याने चोरटे पसार झाले.

त्यानंतर माळी कुटुंबीय घटनास्थळी आले. त्यांनी दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले व पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, निरीक्षक अरविंद काळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू केला. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

स्वयंचलित पिस्तुलातून १५ फैऱ्या झाडल्या

दरोडेखोरांकडे आधुनिक पद्धतीचे स्वयंचलीत पिस्तूल होते. त्यांनी दुकानात आणि बाहेर असे १५ राउंड फायर केले. दरोडेखोरांनी काडतुसाने भरलेले मॅगेझीन आणले होते ते त्यांनी बदलल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते.

धाडसी पीयूषची सतर्कता

दरोडा पडत असताना पीयूष शिताफीने दुकानातील स्ट्रॉंगरूमध्ये घुसला व त्याने आतून दरवाजा लॉक केला. त्यामुळे चांदीचे दागिने आणि रोकड सुरक्षित राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

IPL 2025 Mega Auction: लिलाव संपला! १७३ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी खर्च केले ६३५.३० कोटी रुपये; पाहा खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT