seized team illegal timber forest department. sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : उदगिरी परिसरात दहा ट्रक लाकूड जप्त

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत बेकायदा वृक्षतोड

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी इनामदारवाडी येथे बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याची घटना घडली. यात जवळपास दहा ट्रक बेकायदेशीर लाकूड वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतच ही घटना घडली. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या उदगिरी- इनामदारवाडी नजीक मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळाली.

हा भाग ‘इको सेनसिटिव्ह झोन’ व ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’लगत आहे. त्यानुसार प्रादेशिक वन विभागातील क्षेत्र आहे. श्री. भाटे यांनी मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) एम. रामनुज, उपवनसंरक्षक आर. आर. काळे तथा वनक्षेत्रपाल अमित भोसले यांना ही माहिती दिली. त्यानुसार वनक्षेत्रपाल भोसले, वनपाल व इतर वनरक्षकांचे

पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा प्रत्यक्ष वृक्षतोड झालेल्या ठिकाणी जवळपास १० ट्रक वृक्षतोड झाली असल्याचे दिसले. आज दुसऱ्या दिवशीही पंचनाम्याचे काम सुरू होते. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वनक्षेत्रपाल भोसले, वनरक्षक अक्षय चौगले, विठ्ठल खराडे, आबासाहेब परीट, विशाल पाटील, वनपाल गारदी आदीनी या कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT