rajshri shahu maharaj esakal
कोल्हापूर

Kolhapur : लोककल्याणकारी राजा; राजर्षी शाहू महाराज

शाहू महाराजांच्या लोक कल्याणकारी राज्यामुळे प्रजेला ब्रिटिशांच्या सत्तेचा फारसा त्रास झाला नाही

सकाळ डिजिटल टीम

राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक २ एप्रिल १८९४ ला झाला. या दिवशी कोल्हापूरच्या राज्यकारभाराची सूत्रे शाहू महाराजांच्या हाती आली. शाहू महाराजांनी या प्रसंगी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांनी लोककल्याणाच्या व प्रजाहिताच्या कार्याची नांदीच जणू या जाहीरनाम्यातून जनतेसमोर मांडली. ते जाहीरनाम्यामध्ये म्हणतात, “आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिच्या कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थानची हरएक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर, जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदी करून तमाम प्रजाजन शुद्ध अंतःकरणापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हास साहाय्य करतील, अशी आमची पूर्ण उमेद आहे.

या जाहीरनाम्याच्या सुरुवातीस त्यांनी शिवशकाचा उल्लेख करून, संस्कृती व इतिहासाबद्दल असलेल्या भावना आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणल्या. शाहू महाराज जरी कोल्हापूर संस्थानचे राजे झाले, तरीदेखील ते ब्रिटिश अमलाखालील संस्थांनाचे राजे असल्यामुळे त्यांच्यावर राजकीय बंधने होती. त्यामुळे सर्व संस्थानिक हे ब्रिटिशांचा जाहीरपणे विरोध करू शकत नव्हते. ते सर्व विविध कराराप्रमाणे ब्रिटिशांना बांधील होते. तशीच काहीशी परिस्थिती कोल्हापुरात देखील होती. शाहू राजांच्या पूर्वीपासून समाजाची उन्नती ही स्वातंत्र्या इतकीच महत्त्‍वाची आहे, त्यासाठी ‘समाजातील दारिद्र्य, जातीपाती व्यवस्था यांचे निर्मूलन करून, मग आपण स्वातंत्र्याचा विचार करूया’, अशा प्रकारची धारणा असलेला व समाजसुधारणेचा कार्य अंगीकारलेला समूह महाराष्ट्रात कार्यरत होता.

इंग्रजांनी दिलेल्या आधुनिक शिक्षणामुळे समाजातील सर्व जातीपातीतील लोकांसाठी शिक्षणाची कवाडे खुली होत होती. त्याचा फायदा समाजातील अनेक वर्ष अशिक्षित असलेल्या बहुजन समाजाला व्हावा व त्यांची सामाजिक उन्नती व्हावी, या धोरणाने महात्मा फुले आदी प्रभूती प्रतिनिधित्व करत होते. शाहू महाराजांनी इंग्रजांविरुद्ध कोणतीही उघड भूमिका घेणे हे अडचणीचे असल्याने, फुले आदींच्या विचारांची कास धरून शाहू महाराजांनी समाजाच्या उन्नतीचे कार्य हाती घेतले. ब्रिटिश सत्तेच्या धोरणास धक्का न लावता, लोक कल्याणकरी व प्रजाहिताचे अनेक निर्णय त्यांनी त्याचे कारकिर्दीत घेतलेले दिसून येतात. शाहू महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच तत्कालीन मुंबई इलाख्यात १८९६ रोजी मोठा दुष्काळ पडला. त्याचा सामना करण्यासाठी राजर्षी शाहूंनी, प्रजेला व गुरा-ढोरांना जगवण्यासाठी प्रसंगी बाहेर राज्यातून अन्नधान्य आणले. त्या काळात दुष्काळ रोजगार योजना राबवली.

अशाच प्रकारचे काम जेव्हा प्लेगसारख्या रोगाची साथ आली त्यावेळी महाराजांनी अनेक उपाय योजना अमलात आणल्या. अशा प्रकारे सातत्यने लोकहित समोर ठेवून कार्य केले. शाहू महाराजांच्या लोक कल्याणकारी राज्यामुळे प्रजेला ब्रिटिशांच्या सत्तेचा फारसा त्रास झाला नाही. त्यामुळे शाहू महाराजांची कारकीर्द ही ब्रिटिशांच्या दृष्टीनेही शांततामय अशीच राहिली. शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा आढावा हा मर्यादित लेखांमध्ये करता येणे अशक्य आहे. त्यामुळे महाराजांच्या कार्याला फक्त इतकाच आढावा या ठिकाणी घेतला आहे. शाहू महाराजांनी लोककल्याणाचा मार्ग स्वीकारला व समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन, त्यांना समाजाच्या उन्नत स्तरावरती आणून; प्रगतीचा, विकासाचा मार्ग दाखवला. पुढे यातूनच कोल्हापूरमध्ये भरीव कार्य उभे राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT