कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती मिल खुली झाल्याने कुस्तीचा इतिहास सांगणारा आखाडा प्रकाशझोतात आला आहे. मिलमधील बांधिव विहिरीजवळ असलेला आखाडा सुमारे एकशे चाळीस वर्षांपूर्वीचा असून, त्याचे अस्तित्व टिकणार का, असा प्रश्न पैलवानांना आहे. मिलमध्ये जे खेळाडू कामाला होते, त्यांच्यावर सुरक्षारक्षकाची जबाबदारी सोपवली होती. गोपीनाथ रावण (औरवाड), रंगराव कळंत्रे (बाचणी), तुकाराम अहिर (वाळवा), विलास सावंत (कळंबा) १९७० पूर्वी मिलमधील नामांकित पैलवान होते.
त्यांचा शहरातल्या तालमीत सराव असायचा. काहीजण राजारामपुरीतील हनुमान तालमीत सराव करायचे. महादेव कुंभार, भीमराव पोटे, श्रीपती पाटील-म्हाकवेकर, मारुती चौगले (नंदवाळ) यांनी १९७० नंतरच्या काळात कुस्तीत चमकदार कामगिरी केली. त्यांच्या कारकिर्दीत सुरुवातीला सोसायटीसमोर, तर त्यानंतर चार-पाच वर्षांनी बांधिव विहिरीजवळ आखाडा तयार करण्यात आला. त्या काळात राज्यभरातील आठ मिलमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात होते. त्यात श्री शाहू छत्रपती मिलसह वेस्टर्न इंडिया (मुंबई), पुलगाव कॉटन मिल, अमळनेर, औरंगाबाद, नरसिंग गिरजे (सोलापूर), बडनेरा मिलमधील कामगार सहभागी होत होते.
मिलमधील कामगार विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हायचे. बागल चौकातील बाळासाहेब जगताप व कादर मलबारी कॅरम चॅम्पियन होते. पैलवान रंगराव कळंत्रे व विलास सावंत यांचा दरारा होता. मिलच्या नावावर पैलवान गावोगावच्या मैदानात उतरत.
- महादेव कुंभार, पैलवान
महादेव कुंभा र यांच्याकडेआठवणींचा खजिना
सत्याहत्तरवर्षीय महादेव कुंभार मिलमध्ये सुरक्षारक्षक होते. ते १९७४ ला खेळाडू म्हणून मिलमध्ये नोकरीला लागले. त्यांचे मूळ गाव बोरपाडळे. त्यांचे भाऊ हिंदुराव कुंभार मोतीबाग तालमीत पैलवान होते. त्यांच्यामुळे त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. त्यांनी शालेयस्तरावर सोलापूरला सुवर्णपदक, तर सातारा येथील अधिवेशनात ९२ किलो गटात रौप्यपदक पटकावले. त्यांची नात श्रद्धा व नातू प्रेमराज कुंभार कुस्तीपटू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.