कोल्हापूर

कोल्हापूरची पूरस्थिती टाळता येईल....कुणी आणि काय सुचविले मुख्यमंत्र्यांना उपाय

सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना लागोपाठ दोन वर्षे पूरस्थितीला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र या संस्था व त्यामध्ये कार्यरत अभ्यासक प्रा. डॉ. जय सामंत, निवृत्त सचिव दि. बा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उदय गायकवाड, अनिल चौगुले, उदय कुलकर्णी, केदार मुनिश्वर, भाऊ सूर्यवंशी यांनी 1989, 2005, 2019 व 2020 मध्ये जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूरस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर रोखण्यासाठी निरपेक्ष, वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही उपाय सुचवले आहेत. या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


पूरस्थिती टाळण्यासाठी सुचविलेले उपाय

  • राधानगरी धरणाचे यांत्रिक दरवाजे बदलून अत्याधुनिक दरवाजे बसवावेत 
  • धरणांच्या व तलावांच्या डूब क्षेत्रातील अतिरिक्त गाळ काढावा 
  • प्रलंबित राहिलेले धामणी धरण पूर्ण करावे 
  • पश्‍चिम घाटातील सर्व खाणकाम प्रकल्प बंद करावेत 
  • नदी, उपनदी, ओढा, नाला अशा किमान चार टप्प्यावर त्यांची रुंदी, खोली आणि गाळ याची सर्वेक्षण करून निश्‍चिती व्हावी. 
  • पुराची सरासरी व महत्तम रेषा आखून शहरी, ग्रामीण भागात पूरक्षेत्रातील बांधकामे रोखावीत. 
  • पुलांचे सर्वेक्षण करून पाण्याचा अधिकतम निचरा होईल अशी व्यवस्था 
  • रेडेडोह येथील पाण्याचा निचऱ्याची सोय करावी 
  • पेरूची बाग ते जयंती नाला असा अतिरिक्त पूर वाहून नेणारा जुना चॅनल अधिक रुंद करावा, तेथे पूल बांधून पाणी पुढे जाईल अशी रचना करावी. 
  • पाणलोट क्षेत्रात धूप नियंत्रण उपक्रम प्रभावी राबवावा 
  • पाणलोट क्षेत्रात जमिनीचे बदलाकृती परवानगी व अटीस अधीन राहून असावी 
  • पश्‍चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रात सुरू असणारे यांत्रिक पद्धतीने जमीन सपाटीकरण थांबवावे. 
  • कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्या व उपनद्या दरम्यान नव्याने होणारे पूल, बंधारे व अनुषंगाने विकासकामे करताना अभ्यास करून परवानगी द्यावी. 
  • आलमट्टी धरण 30 सप्टेंबरनंतर भरणे बंधनकारक करावे 
  • आलमट्टीसह कृष्णा खोऱ्यातील नद्या व धरणांतील विसर्ग यांच्यात सुसुत्रतेसाठी "एकात्मिक नियंत्रण प्रणाली' 
  • पाणलोट क्षेत्रातील शेतीत पाचट, गवत जाळणेस बंदी, धूप नियंत्रणासाठी धूप प्रतिबंधक अंतर पिके, तसेच उताराला आडवी मशागत करण्याबाबत अंमलबजावणी करावी. 
  • जंगलक्षेत्र नसलेल्या टेकड्या व डोंगरी भागांत जास्तीत जास्त मुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न. 
  • शेतीमध्ये सेंद्रीय खतांचा वापर; रासायनिक खतांचा व नाशकांचा वापर टाळावा 
  • वाढत्या ऊस क्षेत्राबाबत अभ्यास करून नवी पीक योजना प्रस्तावित 
  • जागतिक तापमान वाढ व बदलांचा अभ्यास करून धरण विसर्ग करावयाचे फेररचना 
  • संभाव्य पाणी पातळी वाढ सांगणारी तत्काळ संदेश प्रणाली विकसित करावी 
  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधने आणि नव्या आपत्ती व्यवस्थापन आराखडयासह कार्यन्वित करावा. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT