कोल्हापूर : ललीत पंचमीला दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या हजारो भाविकांची गर्दी असते. मात्र ही गर्दी टाळून यंदा मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थित आज त्र्यंबोली देवीच्या टेकडीवर ललित पंचमी यात्रा साजरी झाली. निधी श्रीकांत गुरव या कुमारीकेच्या हस्ते कामाक्ष राक्षसाचा (कोहाळा)चा वध होताच काही मिनीटे थरार उडाला. कोहळ्याची शकले घेण्यासाठी भाविकांची झटपट उडाली. ढकला ढकली झाली. अवघ्या तीन मिनीटांच्या थरारानंतर पून्हा विधी, पूजेचे सूर मंदिर गाभाऱ्यात घुमु लागला. त्यानंतर त्र्यंबोली देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले.
शहरालगतच्यात टेकडीवरील त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी आंबाबाई, तुळजाभवानी देवीच्या पालख्या सजवलेल्या रथातून आणण्यात आल्या. त्या पाठोपोठ महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, राजकुमार यशराजे छत्रपती यांचे आगमन झाले. त्यांच्या उपस्थित आरती व धार्मिक विधी झाले. कुमारीका 'निधी' हीच्या हस्ते कोहळा पूजन झाले. कामाक्ष राक्षसाचा वध देवी करते, त्याचे प्रतिक म्हणून या कुमारीकेच्या हस्ते कोहळा फुटताच उपस्थित भाविकांची शकल घेण्यासाठी झुंबड उडाली. तशी ललिता पंचमी यात्रा साजरी झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच भाग म्हणून कोहळा पंचमी सोहळ्या गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली. त्यासाठी पोलिसांनी मोजक्या मानकऱ्यांना टेकडीवर तसेच मंदिरात प्रवेश दिला. कोहळा पूजन विधी वेळी मोजकेच भाविक मानकरी उपस्थित होते. टेंबलाईवाडी, विक्रमनगर भागातील काही युवकांचे गट टेकडीच्या भोवती थांबून होते. ते कोहळा सोहळ्यास येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी सर्वांना पिटाळून लावले. तर मंदिराच्या प्रवेशव्दारावर शेकडो भाविक कोहळा पंचमी सोहळ्यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने थांबून होते.
'अंबाबाई'ची आजची पूजा गजारूढ अंबारीतील
दरम्यान, परंपरेप्रमाणे आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ अंबारीतील पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक अरुण मुनीश्वर, विद्याधर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.