Land Acquisition Notice for Airport Expansion; Rahul Rekhawar kolhapur sakal
कोल्हापूर

विमानतळ विस्तारीकरणासाठी भू-संपादनाची नोटीस द्यावी ; राहुल रेखावार

जिल्हाधिकाऱ्यांची प्रांत, तहसीलला सूचना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगी (ता. करवीर) मधील ६४ एकर अतिरिक्त जमीन ताब्यात घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांची सहमती घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या. दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणासाठी प्रशासनाकडून गतीने प्रयत्न सुरू आहेत.

विमानतळ विस्तारीकरणासाठी ६४ एकर जमिनीची आवश्‍यकता आहे. ही जमीन मिळाल्यानंतर विस्तारीकरणाचे काम सोपे होणार आहे. जमीन घेतल्यानंतर नाईट लॅंडिंगसह इतर सुविधांवर भर दिला जाणार आहे.दरम्यान, करवीर प्रांत व तहसीलदारांकडून संबंधित शेतकऱ्यांची चर्चा केली जाणार आहे. तत्पूर्वी त्यांना जमीन संपादनाची नोटीस काढावी, अशा सूचना दिल्या आहेत.

अनेक दिवसांपासून जमीन ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. यापूर्वी या जमिनीची मोजणी झाली आहे. दरम्यान, आता नोटीस देऊन त्यांची सहमती घेतली जाणार आहे. याबद्दल करवीरचे प्रांत वैभव नावडकर व तहसीलदार शीतल मुळ्ये-भामरे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. आता नोटीस देण्याचे काम केले जाणार आहे. या ऑनलाईन बैठकीत नावडकर, मुळ्ये-भामरे यांच्यासह इतर अधिकारी सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT