कोल्हापूर : तंबाखू (Tobacco)असो की खाऊचे पान. चुन्याशिवाय तंबाखू, पानाला रंगत येत नाही. असा देशी चुना(lime) आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. देशी चुना तयार करण्यासाठी लागणारे चुनखडक(limestone) कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिळत नाहीत, ही स्थिती आहे.
गारगोटी, राधानगरी, गडहिंग्लज, चंदगड या भागातील शेतीत चुनखडक जमिनीच्या पृष्ठभागावर मिळत. ते गोळा करून घाण्यातून देशी चुना तयार केला जात असे. जमिनीच्या पृष्ठभागावर सहजपणे मिळणारे चुनखडक हळूहळू लुप्त होत गेले. तसेच, चुना घाण्यांचे प्रमाणही कमी झाले. परिणामी, लक्ष्मीपुरी मंडईत देशी चुन्याचे प्रमाणही कमी झाले. हा चुना काळपट असल्याने अनेक जण तो घेत नाहीत. त्याला आयुर्वेदात महत्त्व आहे. अन्य कामांतही तो वापरला जातो. क्वचितच पानपट्टीत देशी चुना मिळतो. पानपट्टीत मिळणारा पांढरा चुना मध्य प्रदेशात तयार केला जातो.
भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्यात आजूबाजूच्या खडकांतून विरघळून आलेले कॅल्शियम कार्बोनेट असते. या पाण्यावर रासायनिक, जैव क्रिया होऊन चुनखडकाचे निक्षेपण (साचण्याची क्रिया) होते. भूकवचाच्या खडकांत कॅल्शियम सामान्यपणे आढळत असून, कवचात त्याचे प्रमाण तीन ते चार टक्के असते. दख्खन पठार ज्वालामुखीतून तयार झाले. त्यामुळे चुनखडकातील बहुतेक सर्व कॅल्शियम अग्निज खडकांतून आलेले आहे. झीज होऊन, रासायनिक प्रक्रियामुळे निरनिराळ्या खडकांचे विघटन होते. त्यातील कॅल्शियम पाण्यात विरघळते. काही कॅल्शियम तुकड्याच्या रूपात जमिनीच्या पृष्ठभागावर येते.
पांढरा चुना कुठून येतो?
चुनखडी किंवा कंकर भाजून कळीचा चुना तयार होतो
ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थानमधून चुनखडीचा चुना
गुंडपूर, मंगलनोर, होसदुर्ग, कासरगोड, उडिपी तालुक्यांतून शिंपल्यांचा चुना
रामेश्वरम्, पुलिकत सरोवर येथील शिंपले, मानारच्या आखातातील प्रवाळातून चुना
चुन्याचे उपयोग
खाऊचे पान, तंबाखूबरोबर
गूळ निर्मितीत
घर रंगविण्यासाठी
आयुर्वेदात, औषध निर्मितीत
सिमेंट, लोह-पोलाद, बांधकाम, औद्योगिक क्षेत्रांत
सर्वाधिक चुनखडक चंद्रपूर, नागपूर आदी भागांत आढळतात. कोल्हापूर जिल्ह्यात हे प्रमाण पूर्वी खूप होते. त्याचा विविध माध्यमांत उपयोग होऊ लागल्याने कालांतराने प्रमाण कमी झाले. चुनखडक हा भूकवचाचा एक सामान्य घटक असून, तो गाळाच्या खडकांचा प्रकार आहे. कॅल्शियम कार्बोनेटने बनलेल्या खडकास चुनखडक म्हणतात.
- डॉ. उल्हास भागवत,
भूवैज्ञानिक
लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये काही स्त्रिया देशी चुना घेऊन येतात. अजूनही काळा चुना म्हटले की नाके मुरडतात; पण देशी चुन्याला महत्त्व आहे. शहरात अन् जिल्ह्यात ज्या पानपट्ट्या आहेत, तिथे कळीचा (पांढरा) चुना पॅकेटस् किंवा छोट्या डबीतून विकला जातो. तो कटणी (madhya pradesh) येथून येतो. पूर्वी कोल्हापूरमध्ये देशी चुना तयार करण्याच्या घाणी होत्या. आता त्या दिसत नाहीत.
- अरुण सावंत, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.