Hasan Mushrif Satej Patil esakal
कोल्हापूर

Satej Patil : पक्षात येण्याची हसन मुश्रीफांची ऑफर सतेज पाटील स्वीकारणार? काँग्रेस आमदारानं केला मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंत्री झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा लवकर सुटेल, असे वाटत नाही.

कोल्हापूर : पक्षात येण्याची मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची ऑफर असली तरीही मी महाविकास आघाडीतूनच लढणार आहे. लोकसभेसाठीही जिल्ह्यातील एक मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित भेटीगाठी कार्याक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भागातील नागरी समस्यांसाठी निधी पाहिजे, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात नाही, यासह अन्य वैयक्तिक समस्या घेऊन आज सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांनी काँग्रेस कमिटीत हजेरी लावली होती.

सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत या सर्वांच्या समस्या आमदार पाटील यांनी जाणून घेतल्या. काहींच्या समस्या सोडविण्यासाठी तेथूनच संबंधित अधिकारी, प्राचार्य यांनाही थेट संपर्क केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भागातील नागरी समस्यांबाबत गाऱ्हाणी मांडली. त्या सोडविण्यासाठी आवश्‍यक निधी देण्यासह संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना या भेटीगाठी कार्यक्रमातून देण्यात आल्या.

या कार्यक्रमानंतर आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा आणि राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. आमदार पाटील म्हणाले, ‘इतर पक्षांमध्ये फूट पडली असली तरीही काँग्रेस राज्यात आणि जिल्ह्यात एकसंध आहे आणि तो एकसंधच राहील. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबईत बैठका सुरू आहेत, मात्र याचा निर्णय दिल्लीतच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक काँग्रेसला द्यावा, अशी आमची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंत्री झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा लवकर सुटेल, असे वाटत नाही. मंत्री होणार म्हणून गतवर्षी शिवलेली जॅकेट आता अनेकांना अपुरी पडत आहेत.’

मणिपूरची घटना दडपण्याचा प्रयत्न

आमदार पाटील म्हणाले, ‘देशाचा अमृतमहोत्सव सुरू असताना मणिपूरसारखी घटना दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. दीड महिन्यानंतर इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर ही घटना सर्व जगासमोर आली आहे. स्थानिक मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला दिला होता का? दिला असला तरीही केंद्र शासन का गप्प बसले होते? केलेले पाप झाकण्याचा हा प्रयत्न आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Brand: दिवाळी अगोदर सर्वसामान्यांना मोठा झटका! 'भारत' ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळीही महागल्या, काय आहे किंमत?

IND vs NZ: सुट्टी नाही...! वर्ल्ड कप जिंकून आता भारताला टक्कर देणार; न्यूझीलंडचा संघ हरमनप्रीत कौरचं टेंशन वाढवणार

Share Market Opening: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; निफ्टी 24,800च्या खाली, कोणते शेअर्स घसरले?

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला हवाय आरोग्यदायी पदार्थ, दही पोहे आहे बेस्ट ऑप्शन

Phaltan : दोन्ही निंबाळकरांतच प्रतिष्ठेची लढाई; अजित पवार मतदारसंघावर दावा कायम ठेवणार? रामराजेंच्या रणनीतीकडे लक्ष

SCROLL FOR NEXT