गेल्या अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची चर्चा होती. मात्र त्यावर निर्णय होत नव्हता.
इचलकरंजी : बांधकाम कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी (Loom workers) स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास आज तत्वतः मान्यता देण्यात आली. मंत्रालयात कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक झाली. यामध्ये हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या मंडळात वस्त्रोद्योगातील (Textile Industry) सर्व प्रकारच्या कामगारांचा समावेश करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
गेल्या अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची चर्चा होती. मात्र त्यावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे कोणतीही सुरक्षितता नसल्याने या क्षेत्रात नविन कामगार येत नव्हते. या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी जोर धरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. मंत्री मुश्रीफ हे इचलकरंजी (Ichakaranji) दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी आले होते. त्यावेळी त्यांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला.
प्राथमिक चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थीतीत बैठक झाली. बैठकीस राज्यातील सर्व वस्त्रोद्योग केंद्रातील आजी-माजी आमदारांसह यंत्रमाग व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले होते. बैठकीत सुरुवातीपासूनच सकारात्मक चर्चा झाली. यंत्रमाग कामगार हा उपेक्षीत घटक असून त्यांना मंडळाच्या माध्यमातून किमान सुरक्षितता मिळण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रत्येकने मांडले.
केवळ यंत्रमाग कामगाराच नव्हे तर जॉबर, कांडीवाले, दिवाणजी, वहिफणी कामगार यांनाही या मंडळात समाविष्ट करुन घेण्याबाबत सूचना करण्यात आली. त्यावर सर्वांचेच एकमत झाले. एकूणच चर्चेअंती एकमुखी मंडळाला यावेळी तत्वतः मंजुरी देण्यात आली. बैठकीस मंत्री दादा भुसे, आमदार प्रकाश आवाडे, प्रणिती शिंदे, सुभाष देशमुख, मुनीफ इस्माईल, अनिल बाबर यांच्यासह मदन कारंडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नरसय्या आडाम, अमित गाताडे, प्रधान सचिव विनिता वेदसिंघल, विकास आयुक्त डाॅ.अश्वीनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह सतिष कोष्टी, विनय महाजन, महादेव गौड, बंडोपंत मुसळे, राजू पारीक, सुनिल शिंदे, उदयसिंग पाटील, कामगार नेते दत्ता माने, भरमा कांबळे आदी उपस्थीत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.