सर्वात वरच्या थरावर जावून हांडी फोडणारे प्रकाश मोरे यांना ५१ हजार रुपयांचे अमरेंद्र पृथ्वीराज महाडिक पारितोषिक देण्यात आले.
Kolhapur Dahihandi : सळसळता उत्साह, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कठंता, संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि ईर्षेला पेटलेली गोविंदा पथके अशा रोमहर्षक वातावारणात काल महाडिक युवा शक्तीचा दहिहांडी (Mahadik Yuva Shakti Dahihandi) सोहळा झाला.
गडहिंग्लजच्या (Gadhinglaj) नेताजी पालकर व्यायामशाळा गोविंदा पथकाने (Netaji Palkar Govinda Team) ७ थर रचत दहीहांडी फोडली. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या हस्ते गोविंदा पथकाला ३ लाखाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्वात वरच्या थरावर जावून हांडी फोडणारे प्रकाश मोरे यांना ५१ हजार रुपयांचे अमरेंद्र पृथ्वीराज महाडिक पारितोषिक देण्यात आले.
दसरा चौक मैदानात हा सोहळा पार पडला. सुरुवातीला गोविंदा पथकांनी ६ ते ७ थरांचे मनोरे रचून सलामी दिली. त्यानंतर दहीहांडी पाच फूट खाली घेण्यात आली. सलामी दिलेल्या मंडळांची सोडत काढून त्यांना दही हांडी फोडण्यासाठी पाचारण करण्यात आले. पहिल्या फेरीत जय महाराष्ट्र गोविंदा पथक (शिरोळ) यांनी सर्वप्रथम मनोरा रचला.
त्यानंतर शिरोळ मधल्याच जय हनुमान तालीम मंडळाच्या गोविंदा पथकाने ६ थरांचा मनोरा रचला. तासगावच्या गतविजेत्या संघर्ष गोविंदा पथकाने शर्थीने ७ थर लावले. त्यानंतर क्रमवारीनुसार नेताजी पालकर व्यायमशाळा गोविंदा पथकाने पाच थर लावले. यानंतर पुन्हा दहीहांडी एक फुट खाली घेऊन सोडत काढण्यात आली. यामध्ये नेताजी पालकर पथकालाच पहिल्यांदा संधी मिळाली.
यावेळी मात्र पथाकातील गोविंदांनी पहिल्या थरापासूनच भक्कम उभारणी करायला सुरुवात केली. सात थर लावून त्यांनी हांडी फोडली. विजेत्या संघाला पारितेषिक देण्यात आले. विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे, विनायक सुतार, अनंत यादव, इंद्रजीत जाधव, उत्तम पाटील यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.