Malkapur  sakal
कोल्हापूर

Malkapur : मलकापूरमध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार;चार नगरसेवक फोडण्यात अतुल भोसले गटाला यश

आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला मलकापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मलकापूरचे चार नगरसेवक मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर: आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला मलकापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मलकापूरचे चार नगरसेवक मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिण व मलकापूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येणाऱ्या विधानसभा व मलकापूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने गनिमी काव्याने यश मिळवले, तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपच्या गोटात आणण्यात अतुल भोसले यांनी यश मिळवले आहे. भोसलेंच्या खेळीने विधानसभेच्या निवडणुकांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांचे वर्चस्व असणाऱ्या मलकापूर पालिकेतील बांधकाम सभापतींसह चार नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पृथ्वीराज चव्हाण गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

२००६ पासून आजअखेर २२ वर्षे मलकापूर पालिकेवर श्री. चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व आहे. श्री चव्हाण यांचे विश्वासू कऱ्हाड दक्षिणचे काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक निवडणुकीमध्ये येथील जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे. एकहाती सत्तेमुळे शहराचा चेहरा- मोहरा बदलला आहे. अनेक नावीन्यपूर्ण योजना येथे राबवल्या गेल्या आहेत. प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांचे यामध्ये योगदान आहे. काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पोषक वातावरण आहे. मात्र, चार नगरसेवकांच्या भाजपच्या पक्षप्रवेशामुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून, मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडणार आहे.

भाजपच्या खेळीकडे लक्ष

मलकापूर आणि कऱ्हाड दक्षिण विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप आणखी काय खेळी करणार, किती घडामोडी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT