Mandlik Mushrif candidate group atmosphere village in kolhapur 
कोल्हापूर

मंडलिक, मुश्रीफ गटाचे अस्तित्व लागले पणाला 

रमजान कराडे

नानीबाई चिखली (कोल्हापूर) : लिंगनूर कापशी (ता. कागल) येथे एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या मुश्रीफ व मंडलिक गटासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली असून, यात बाजी कोण मारणार, याचीच उत्सुकता आहे. गतनिवडणुकीत एकत्र असलेल्या मुश्रीफ व मंडलिक गटाने यावेळी सवतासुभा मांडताना एकमेकांविरोधात तोडीस तोड उमेदवार दिले आहेत.  

मुश्रीफ गटाने माकप गटाशी हातमिळवणी करताना श्री भावेश्वरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे. याचे नेतृत्व माजी सरपंच मयूर आवळेकर, गुंडा आवळेकर, आनंदा पोवार, प्रवीण जाधव, शिवाजी मेथे, विलास भोसले करीत आहेत. विरोधात मंडलिक गटाने राजे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, सुभाषबाबू मित्र मंडळ यांच्याशी युती करताना श्री पंत भावेश्वरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे.

याचे नेतृत्व पंचायत समिती सदस्य विश्वास कुराडे, सदासाखर संचालक शहाजी यादव,नानासो घाटगे,रामचंद्र यादव, संभाजी यादव करीत आहेत.  गेले आठ दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 

दृष्टिक्षेपात
    एकूण प्रभाग : ३
    एकूण जागा : ९
    मतदार : १७३३

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT